छेत्रीचे भारतीय संघात पुनरागमन; आशियाई करंडकसाठी खेळाडूंची नावे जाहीर

भारताचा स्टार स्ट्रायकर सुनील छेत्रीचे भारताच्या राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघात पुनरागमन
Sunil Chhetri
Sunil Chhetrisakal

नवी दिल्ली : भारताचा स्टार स्ट्रायकर सुनील छेत्रीचे भारताच्या राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघात पुनरागमन झाले आहे. भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी जूनमध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई करंडकाच्या पूर्वतयारी शिबिरासाठी ४१ संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.(Sunil Chhetri News)

दुखापतीमुळे ३७ वर्षीय छेत्री बहारीन आणि बेलारूसविरुद्धच्या अलीकडील मैत्रीपूर्ण सामन्यांमधून बाहेर पडला होता. प्रशिक्षकांनी नावे जाहीर केलेले खेळाडू आणि सहायक कर्मचारी २३ एप्रिल रोजी ‘बेल्लारी’ येथे जमतील व ते ८ मेपर्यंत आपला सराव सुरू ठेवतील.

त्यानंतर पात्रता फेरीपर्यंत शिबिर सुरू ठेवण्यासाठी संघ कोलकाता येथे जाईल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागानचे खेळाडू त्यांच्या संबंधित क्लब वचनबद्धतेनंतर शिबिरात सामील होण्यासाठी रवाना होतील. चीनमध्ये २०२३ मध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई करंडकाच्या पात्रता फेरीसाठी भारताला ‘ड’ गटामध्ये हाँगकाँग, अफगाणिस्तान आणि कंबोडिया यांच्यासोबत ठेवण्यात आले आहे.

संघातील संभाव्य खेळाडू : गोलरक्षक- गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, प्रभशुखान गिल, महम्मद नवाज, टीपी रेहनेश.

बचावपटू : प्रीतम कोटल, आशुतोष मेहता, आशिष राय, हॉर्मिपम रुईवाह, राहुल भेके, संदेश झिंगन, नरेंद्र गहलोत, चिंगलेनसाना सिंग, अन्वर अली, सुभाषिश बोस, आकाश मिश्रा, रोशन सिंग, हरमनजोत सिंग खाबरा.

मिडफिल्डर : उदांता सिंग, विक्रम प्रताप सिंग, अनिरुद्ध थापा, प्रणय हलदर, जेक्सन सिंग, ग्लान मार्टिन्स, व्हीपी सुहेर, लालेंगमाविया, सहल अब्दुल समद, यासिर महम्मद, लल्लियांझुआला छांगटे, सुरेश सिंग, ब्रॅंडन फर्नांडिस, ऋत्विक कुमार दास, ललथांग, राहुल खाऊ केपी, लिस्टन कोलाको, बिपिन सिंग, आशिक कुरुनियान.

फॉरवर्ड : मनवीर सिंग, सुनील छेत्री, रहीम अली, इशान पंडिता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com