नवी दिल्ली : भारतीय कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या कारकिर्दीची फिफाने दखल घेत त्याचे कौतुक केले आहे. तीन भागांची एक मालिका प्रसिद्ध केली आहे. FIFA+ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका पाहता येणार आहे.
तुम्ही रोनाल्डो, मेस्सी यांची महती ओळखता, आता आणखी एका महान खेळाडूची कथा पाहा. देशाकडून खेळताना सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये तो तिसरा आहे. सुनील छेत्री असे त्याने नाव आहे. कॅप्टन फॅन्टास्टिक ही मालिका FIFA+ वर पाहता येईल, असे ट्विट करून फिफानेच ही माहिती दिली आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूत रोनाल्डो (११७ गोल) पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर लिओनेल मेस्सी (९०) आणि सुनील छेत्री (८४) अशी क्रमवारी आहे. तीन भागांच्या मालिकेतील पहिल्या भागात छेत्रीने फुटबॉलला कशी सुरुवात केली, त्यानंतर २० व्या वर्षी भारताकडून पदार्पण केले, याचे चित्रीकरण आणि माहिती आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.