ऋतुराज गायकवाडसंदर्भात सुनील गावसकरांचे मोठं वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad
ऋतुराज गायकवाडसंदर्भात सुनील गावसकरांचे मोठं वक्तव्य

ऋतुराज गायकवाडसंदर्भात सुनील गावसकरांचे मोठं वक्तव्य

sakal_logo
By
सुशांत जाधव

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच आटोपल्यानंतर भारतीय संघ आता घरच्या मैदानातून नव्याने सुरुवात करणार आहे. रोहित शर्माचे नवे नेतृत्व आणि द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून नव्या शिलेदारांसह रोहित शर्मा मैदानात उतरेल.

बीसीसीआय निवड समितीने अनेक नव्या खेळाडूंना संधी दिली असून यात आयपीएल स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान हे त्रिकूटाची पहिल्यांदाच टीम इंडियात वर्णी लागली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप पटकवणाऱ्या ऋतूराज गायकवाडचाही टीम इंडियात समावेश आहे.

हेही वाचा: भारतीय डॉक्टरने केला उपचार, रिझवानच्या रिकव्हरीची कहाणी थक्क करणारी

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी आयपीएलमधील खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. यावेळी त्यांनी ऋतूराज गायकवाडसंदर्भात मोठी गोष्ट बोलून दाखवली आहे. ऋतूराज गायकवाडमध्ये उत्तम क्षमता आहे. भविष्यात तो तीनही क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसेल, असे मत गावसकरांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: खान साब तुमची जिद्द नडली! पाक आउट झाल्यावर हे ट्वीट व्हायरल

ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना स्पर्धेत 635 धावा केल्या होत्या. ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या ऋतूराज गायकवाडला आगामी स्पर्धेत कोणत्या स्थानावर खेळण्याची संधी मिळणार आणि मिळालेल्या संधीच सोन करण्यात तो यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय संघ 17 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी या मालिकेनं सुरु होईल.

loading image
go to top