INDvBAN : 'दादा'चं कौतुक पडलं विराटला भारी; काय आहे नेमकं प्रकरण!

वृत्तसंस्था
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

कोहलीचे विजयाबद्दल कौतुक करताना भारत त्यापूर्वीही जिंकत होता, याची आठवण करून दिली. 

कोलकता : सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमधील विजयाची मालिका सुरू केली, असे विराट कोहलीच्या म्हणण्यास प्रत्युत्तर देताना सुनील गावसकर यांनी सत्तर, ऐंशीच्या दशकातही भारत जिंकत होता, असे सुनावले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भारताने आता प्रतिस्पर्ध्यांवर हुकमत प्रस्थापित केली आहे. त्याची प्रक्रिया गांगुलीने सुरू केली, असे कोहलीने सांगितले. गावसकर त्यामुळे चिडले. त्यांनी कोहलीचे विजयाबद्दल कौतुक करताना भारत त्यापूर्वीही जिंकत होता, याची आठवण करून दिली. 

- INDvBAN : रोहित-साहाने घेतलेल्या कॅचनं डोळ्याचं पारणं फिटलं! (व्हिडिओ)

गांगुलीच्या संघाने 2000 पासून भारतीय क्रिकेटच्या वर्चस्वास सुरुवात केली. दादाच्या संघाने सुरू केलेली यशोमालिका आम्ही कायम ठेवत आहोत, असे भारतीय कर्णधाराने सांगितले आहे. हे ऐकल्यावर गावसकर संतापले.

- INDvBAN : 'एक ही दिल है विराट भाई, कितनी बार जितोगे!'

दादा हे भारतीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कदाचित कोहली त्यांच्याबद्दल चांगले बोलत असेल; पण सत्तर, ऐंशीच्या दशकातही भारत जिंकत होता. त्या वेळी कोहलीचा जन्मही झाला नव्हता, अशी टिप्पणी गावसकर यांनी केली. 

- INDvBAN : कॅप्टन कोहलीने उलगडले यशाचे रहस्य, काय म्हणाला पाहा (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Gavaskar said after Virat Kohli statement about Sourav Ganguly praise