हैदराबादचा आणखी एक सनसनाटी विजय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

हैदराबाद - मुंबईविरुद्धच्या सामन्यात ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादने आज १३२ धावा करूनही विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गुरुवारी पंजाबचा १३ धावांनी पराभव केला. गेल आणि राहुल यांनी ५५ धावांची सलामी देऊनही पंजाबचा डाव ११९ धावांत संपुष्टात आला.

हैदराबाद - मुंबईविरुद्धच्या सामन्यात ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादने आज १३२ धावा करूनही विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गुरुवारी पंजाबचा १३ धावांनी पराभव केला. गेल आणि राहुल यांनी ५५ धावांची सलामी देऊनही पंजाबचा डाव ११९ धावांत संपुष्टात आला.

भुवनेश्‍वर कुमार संघात नसतानाही हैदराबादची गोलंदाजी जबरदस्त कामगिरी करत आहे. रशिद खान आणि शकिब यांच्या फिरकीला वेगवान गोलंदाजांची चांगली साथ मिळत आहे. पंजाबकडून अंकित राजपूतने पाच विकेट मिळवण्याचा पराक्रम केला, परंतु त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. पंजाबचा ९ बाद १०१ अशी अवस्था झाल्यावर राजपूत आणि मुजीब या अखेरच्या जोडीने रंग भरले होते; पण पाच चेंडूंत १४ धावांची गरज असताना खेळ खल्लास झाला.

दोन दिवसांपूर्वी मुंबईविरुद्धच्या सामन्यात जेमतेम शंभरी पार करू शकलेल्या हैदराबादची आजही शंभर धावा करताना दमछाक झाली. कर्णधार विलिन्सन शून्यावर बाद झाला, तर हुकमी शिखर धवन दोन चौकार मारून परतला तेव्हा डावातील तिसरेच षटक सुरू होते. तेथूनच हैदराबादला अडथळ्यांची शर्यत करावी लागली. अर्धशतक करणारा मनीष पांडे आणि त्याला साथ देणारा  शकिब अल हसन यांनी डाव सावरला खरा, परंतु धावांची गती वाढत नव्हती. पहिल्या टप्प्यात तीन आणि नंतर दोन बळी असे एकूण पाच विकेट मिळवणाऱ्या राजपूतच्या माऱ्यासमोर युसूफ पठाणचीही बॅट थंड झाली होती. 

संक्षिप्त धावफलक - 
हैदराबाद - २० षटकांत ६ बाद १३२ (शिखर धवन ११, मनीष पांडे ५४, शकिब अल हसन २८ , युसूफ पठाण २१, अंकित राजपूत ५-१४) वि. वि. पंजाब - १९.२ षटकांत सर्वबाद ११९ (राहुल ३२, गेल २३ , संदीप शर्मा २-१७, रशिद खान ३-१९, शकिब अल हसन २-१८, बसिल थंपी २-१४).

Web Title: Sunrisers Hyderabad Vs Kings XI Punjab