चॅंपियन्स करंडकातील जर्सी घालूनही युवराज अपयशी!

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

क्वीन्स पार्क येथे झालेल्या या सामन्यामध्ये युवराज फलंदाजीसाठी याआधीच्या चॅम्पियन्स करंडकामध्ये वापरलेली "जर्सी' परिधान करुनच उतरला. मात्र तो 10 चेंडूंमध्ये अवघ्या 14 धावा करुन बाद झाला

नवी दिल्ली - भारताचा शैलीदार फलंदाज युवराज सिंह याला गेल्या काही सामन्यांत सातत्याने येत असलेले अपयश भारतीय क्रीडा समीक्षकांच्या डोळ्यांत भरत आहे. वय वाढलेल्या व ऐन मोक्‍याच्या ठिकाणी अपयशी ठरणाऱ्या युवराजच्या भारतीय संघामधील स्थानाचा "विचार' व्हावयास हवा, अशा आशयाचे मत गेल्या काही महिन्यांत विविध पातळ्यांवर व्यक्त करण्यात आले. यामुळे प्रचंड दडपणाखाली खेळत असलेल्या युवराजने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये एक "प्रयत्न' करुन पाहिला; मात्र यानंतरही त्याला मोठी खेळी करण्यात यश आले नाही.

क्वीन्स पार्क येथे झालेल्या या सामन्यामध्ये युवराज फलंदाजीसाठी याआधीच्या चॅम्पियन्स करंडकामध्ये वापरलेली "जर्सी' परिधान करुनच उतरला. मात्र तो 10 चेंडूंमध्ये अवघ्या 14 धावा करुन बाद झाला. या पार्श्‍वभूमीवर, त्याच्यावरील दडपण आणखी वाढल्याचे मानले जात आहे. युवराजला मोठी खेळी करण्यात अपयश आल्यानंतरही भारताने विंडीजवर मोठा विजय मिळविला.

Web Title: Superstitious Yuvraj Singh Wears Champions Trophy Jersey

टॅग्स