IPL 2022 : शास्त्री गुरुजींची साथ; अनसोल्ड रैनाची मागच्या दारानं एन्ट्री

आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स देखील आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याच्या तयारीत व्यस्त
suresh raina and ravi shastri
suresh raina and ravi shastrisakal

आयपीएलचा (IPL 2022) 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होत आहे. जगभरातील लाखो क्रिकेट चाहते लीग सुरू होण्याची वाट आतुरतेने पाहत आहेत. यावेळचा आयपीएल सीझन खूपच रोमांचक असणार आहे कारण यावेळी 8 ऐवजी 10 संघचा सहभागी असणार आहेत. आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्स देखील आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. स्टार नेटवर्कने एक मोठा निर्णय घेतला आहे. सुरेश रैना आणि रवी शास्त्री यांचा आयपीएलच्या हिंदी कॉमेंट्री टीममध्ये समावेश केला आहे. डिज्नी स्टारचे सीईओ संजोग गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

संजोग गुप्ता यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार 'यावेळी सुरेश रैना आयईपीएलमध्ये खेळणार नाही. पण आम्हाला त्याला आयपीएलशी जोडायचे आहे. त्याला मिस्टर आयपीएल म्हटले जाते आणि एकेकाळी तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यांचे करोडो चाहते आहेत.

गुप्ता यांनी रैना बरोबरच रवी शास्त्री देखील हिंदीत कॉमेंटरी करणार आहेत असे सांगितले. गुप्ता म्हणाले, पूर्वी शास्त्री आमच्या स्टार स्पोर्ट्ससाठी इंग्रजीत कॉमेंट्री करायचे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर त्याने आमच्यासाठी कॉमेंट्री केली नाही कारण तो मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात सामील झाला होता. सध्या रवी शास्त्री हिंदी सुधारण्यासाठी झूमवर क्लासेस करत आहेत. त्यांना काही नोट्सही पाठवण्यात आले आहेत.'

सुरेश रैना, आयपीएल 2022 च्या लिलावात विकला गेला नाही. त्याची बेस प्राईस 2 कोटी होती. रैना आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रैनाने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 5,528 धावा केल्या आहेत. त्यांच्या पुढे फक्त विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत. तो चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com