
Suresh Raina MS Dhoni CSK : धोनीने माझ्याकडून परवानगी घेतली अन्... रैनाने सांगितलं चेन्नईने कशी जिंकली फायनल?
Suresh Raina MS Dhoni CSK IPL : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 2021 च्या हंगामात काही मोठे निर्णय घेतले होते. संघ व्यवस्थापनाने रॉबिन उथप्पासाठी सुरेश रैनाला वगळले होते. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात चेन्नईने नव्याने संघात आलेल्या रॉबिन उथप्पाला संधी दिली होती. यावेळी धोनीने त्याचा जिगरी दोस्त सुरेश रैनाला संघाबाहेर ठेवले होते. ट्रेडिंगमार्फत चेन्नईने रॉबिन उथप्पाला आयपीएल 2021 च्या हंगामात आपल्या गोटात घेतले होते. महेंद्रसिंह धोनीने त्यावेळी नाणेफेकीवेळी रैना दुखापतग्रस्त असल्याचे सांगितले होते.
मात्र याबाबत आता खुद्द सुरेश रैनाने या मागची काहाणी सांगितले. रॉबिन उथप्पासोबतच्या एका कार्यक्रमात बोलताना रैनाने याबाबतचा खुलासा केला. जिओ सिनेमावरील या कार्यक्रमादरम्यान सुरेश रैना उथप्पाला म्हणाला की, 'ज्यावेळी मी आणि महेंद्रसिंह धोनी बोलत होतो त्यावेळी मी त्याला रॉबिन उथप्पाला संधी दिली पाहिजे असं सुचवलं. त्यानंतर धोनीने माझ्याकडे तुला खेळवण्याबाबत परवानगी घेतली. त्यावेळी मी त्याला म्हणालो की, हा खेळाडू तुला फायनलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेव.'
चेन्नईने रैनाला संघाबाहेर ठेवून एक उजव्या हाताचा फलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला होता. रैनाला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय धोनीने माझ्यावर थोपला नव्हता असं रैनाला सुचवायंच होतं तो म्हणाला की, 'महेंद्रसिंह धोनी मला म्हणाला होता की आपण 2008 पासून खेळतोय मात्र मला हंगाम जिंकायचा आहे. आता तूच सांग की मी काय करू. त्यावेळी मी त्याला रॉबिन उथप्पाला तिसऱ्या क्रमांकावर खेळवं आणि तो फायनलपर्यंत प्लेईंग 11 मध्ये कसा खेळेल हे बघ. जर तू जिंकलास तर सीएसएके जिंकणार आहे. मी खेळलो काय आणि तो खेळला काय? रॉबिन आणि रैना एकच आहेत.'
आयपीएल 2021 मध्ये उथप्पाने चार सामन्यात 115 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 136.60 होता. सीएसकेने आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला होता.