'एकच वादा, सूर्या दादा' म्हणत फॅनने मुंबईवरून थेट डब्लिंग गाठले

Surya Kumar Yadav Fans Came From Mumbai To Dublin For Watch
Surya Kumar Yadav Fans Came From Mumbai To Dublin For Watchesakal

डब्लिन : टीम इंडिया (Team India) भारतात खेळत असली किंवा विदेशात खेळत असली तरी भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहते स्टेडियममध्ये नाहीत असं कधी होणार नाही. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतातील क्रिकेटवेडे जगाच्या पाठीवर कोठेही जाऊ शकतात. नुकतेच टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर दोन टी 20 सामन्यांची मालिके खेळली. यावेळी देखील भारतीय चाहत्यांनी मैदान भरून गेले होते. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) देखील या संघात होता.

या मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवला पाहण्यासाठी मुंबईवरून त्याचे चाहते थेट डब्लिन येथे पोहचले होते. या फॅन्ससोबतचा फोटो सूर्यकुमार यादवने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. सूर्यकुमारच्या चाहत्यांनी 'एकच वादा सूर्या दादा', 'फक्त सूर्यकुमारला पाहण्यासाठी मुंबई ते डब्लिन' असे फलक तयार केले होते. सूर्यकुमारने या सर्वांचे फोटो शेअर करत 'आम्ही कोठेही गेलो तरी अशा प्रकारचे प्रचंड समर्थन आम्हाला पहावयास मिळते. ही गोष्ट मनात घर करून गेली. कायम आमची साथ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार.'

सूर्यकुमार यादवला आयर्लंड (Ireland) विरूद्धच्या मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही सामन्यात मिळून त्याला फक्त 15 धावाच करता आल्या. पहिल्या सामन्यात तर तो शुन्यावर बाद झाला होता. सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत देखील खेळणार आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. कसोटी मालिका 1 जुलैपासून तर वनडे मालिका 12 जुलैपासून सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com