मुंबईच्या विजयात सूर्यकुमार तळपला

सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव

मुंबई : सहा धावांनी शतकापासून दूर राहिलेल्या सूर्यकुमार यादवने तडाखेबाज फलंदाजी करताना शिवम दुबेच्या साथीत 8.1 षटकांत 84 धावांची झंझावाती भागीदारी केली, त्यामुळे मुंबईने मुश्‍ताक अली ट्‌वेंटी 20 स्पर्धेत कर्नाटकला सात विकेट आणि सहा चेंडू राखून पराजित केले आणि सुरतला सूरु असलेल्या या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला.

पंजाबविरुद्ध आक्रमक 84 धावा केलेल्या राहुलला शम्स मुलानीच्या फिरकीने पहिल्याच षटकात चकवून मुंबईला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. कर्नाटकची अवस्था 4.1 षटकांत 3 बाद 19 झाली होती, पण देवदत्त पडिक्कलचे अर्धशतक आणि रोहन कदमच्या आक्रमक पाऊण शतकामुळे कर्नाटकने जवळपास पावणेदोनशेचे आव्हान मुंबईला दिले.

पृथ्वी शॉ आणि आदित्य तरेने मुंबईची धडाक्‍यात सुरुवात केली खरी, पण त्यांना संयम राखता आला नाही. श्रेयस अय्यरही जम बसला असे वाटत असतानाच परतला. सूर्यकुमार यादवने मात्र नियंत्रित आक्रमण करताना फिरकीस लक्ष्य केले. त्याने शतक पूर्ण करण्याऐवजी विजय मिळवण्यास पसंती दिली. शिवम दुबेने त्याला योग्य साथ दिली आणि मुंबईला विजयासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. यादव-दुबेच्या 84 धावांच्या भागीदारीत दुबेचा वाटा 22 धावांचा होता, त्यावरून सूर्यकुमारची आक्रमकता लक्षात येईल.

या विजयासह मुंबईने अव्वल साखळीच्या ब गटात दुसरा क्रमांक मिळवला. आघाडीवरील कर्नाटकने मुंबईला चार गुणांनी मागे टाकले आहे, पण ते एक लढत जास्त खेळले आहेत. मुंबईची गटातील अखेरची साखळी लढत गटात तिसरे असलेल्या पंजाबविरुद्ध आहे.

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक ः 6 बाद 171 (केएल राहुल 0, देवदत्त पडिक्कल 57- 34 चेंडूत 4 चौकार व 4 षटकार, मनीष पांडे 4, करुण नायर 8, रोहन कदम 71- 47 चेंडूत 7 चौकार व 3 षटकार, शम्स मुलानी 2-0-8-1, शार्दुल ठाकूर 4-0-29-2, शिवम दुबे 4-0-39-2) वि. वि. मुंबई ः 19 षटकांत 3 बाद 174 (पृथ्वी शॉ 30- 17 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार, आदित्य तरे 12- 6 चेंडूत 3 चौकार, श्रेयस अय्यर 20- 14 चेंडूत 1 चौकार, सूर्यकुमार यादव नाबाद 94- 53 चेंडूत 11 चौकार व 2 षटकार, शिवम दुबे नाबाद 22- 18 चेंडूत 2 षटकार).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com