Team India: टीम इंडियाची घोषणा होताच 'या' खेळाडूची कसोटी कारकीर्द संपली? निवडकर्त्यांनी बाहेर फेकले

निवड समितीने संघातून दाखवला बाहेरचा रस्ता
India Squad WTC Final 2023
India Squad WTC Final 2023

India Squad WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी निवडकर्त्यांनी आज टीम इंडियाची घोषणा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळला जाणार आहे.

टीम इंडियाची घोषणा होताच भारतीय दिग्गज खेळाडूची कसोटी कारकीर्द जवळपास संपली आहे. निवड समितीने अचानक एका खेळाडूला भारताच्या कसोटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

India Squad WTC Final 2023
Team India : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी, पण उपकर्णधाराचं नाव मात्र गुलदस्त्यातच

एक मोठा निर्णय घेत निवडकर्त्यांनी मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवला कसोटी संघातून वगळले आहे. निवडकर्त्यांनी सूर्यकुमार यादवला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियामध्ये स्थान दिले नाही.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी सूर्यकुमार यादव हा सर्वात मोठा दावेदार असल्याचे मानले जात होते, परंतु निवडकर्त्यांनी अचानक अजिंक्य रहाणेचे 15 महिन्यांनंतर पुनरागमन केले. सूर्यकुमार यादवसारख्या स्फोटक फलंदाजाची निवड न करणे ही निवडकर्त्यांची सर्वात मोठी चूक ठरू शकते.

India Squad WTC Final 2023
WTC Team India Squad: 15 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! रहाणे पुन्हा एकदा संघात सुर्या बाहेर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी निवडकर्त्यांनी जाहीर केलेल्या संघातून त्यांनी सूर्यकुमार यादवला दुधातल्या माशीप्रमाणे वगळले आहे. सूर्यकुमार यादवला भारताकडून फक्त एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने केवळ 8 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात सूर्यकुमार यादव सुपर फ्लॉप ठरला. नागपुरात ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंच्या कहरात टीम इंडियाचा हा फलंदाज भारतीय संघ व्यवस्थापनाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. या एका कसोटी सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले.

India Squad WTC Final 2023
Team India Squad : WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा! 'या' खेळाडूंना मिळाली संधी

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव यादव. .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com