Harmanpreet Kaur: भीमपराक्रमी हरमनप्रीत! एका दिवसात केले अनेक वर्ल्ड रेकॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

t20 wc harmanpreet kaur-becomes-first-ever-cricketer-to-play-150-t20i-first-indian-to-complete-3000-runs cricket news in marathi

Harmanpreet Kaur: भीमपराक्रमी हरमनप्रीत! एका दिवसात केले अनेक वर्ल्ड रेकॉर्ड

Harmanpreet Kaur Record : दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. तीन सामन्यांपैकी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत. आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेला हा सामना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी खूप महत्त्वाचा होता, कारण या सामन्याद्वारे ती तिचा 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. यासह ती 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर बनली आहे.

हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत भारतासाठी 150 टी-20 सामन्यांमध्ये 3006 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारी भारताची पहिली आणि एकूण चौथी महिला क्रिकेटपटू आहे. बेट्सच्या 143 टी-20 सामन्यात 3820 धावा आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या लॅनिंगने 130 सामन्यांमध्ये 3346 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या स्टॅफनी टेलरने 113 टी-20 सामन्यात 3166 धावा केल्या आहेत.

पुरुषांमध्येही 150 आंतरराष्ट्रीय सामने कोणत्याही क्रिकेटपटूने खेळलेले नाहीत. सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 148 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 31.32 च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. हरमनप्रीत रोहितच्या पुढे गेली आहे. रोहितशिवाय पाकिस्तानच्या शोएब मलिकने 124 टी-20 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने 122 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

हरमनप्रीतने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत एक शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची 103 धावांची खेळी ही त्याची आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वोत्तम खेळी आहे. याशिवाय त्याने 32 विकेट्सही घेतल्या आहेत.