Virat Kohli : सोबत दोन स्टार पण चर्चा फक्त विराटच्या करोडोंच्या घड्याळाची

किंग कोहलीच्या घड्याळावर अनेक चाहत्याची नजर
virat kohli rolex watch price wearing when
virat kohli rolex watch price wearing when sakal

T20 World Cup Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी पहाटे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह सर्व खेळाडू दिसत आहेत. सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाकडून खूप अपेक्षा आहेत. भारताने शेवटचा टी-20 विश्वचषक 2007 साली जिंकला होता. आता 15 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने टीम इंडिया ऑस्ट्रेलियात उतरणार आहे.

virat kohli rolex watch price wearing when
"भगवान राम तुमच्या..." दसऱ्याच्या शुभेच्छा देणाऱ्या शमीला कट्टरवाद्यांकडून जीवे मारण्याचे फोन

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर आपल्या सहकारी खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही दिसत आहेत. विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलियाला निघत आहे. येणारे दिवस खूप छान असतील. त्याने चहल आणि हर्षललाही टॅग केले आहे. मात्र या फोटोनंतर सोशल मीडियावर चहल आणि पटेल यांची चर्चा न होता. विराट कोहलीच्या घड्याळाचे सर्वाधिक चर्चा झाली

virat kohli rolex watch price wearing when
Ind vs Sa 1st ODI: पावसावर सामन्याचे भवितव्य, आफ्रिकेविरुद्ध आजपासून एकदिवसीय मालिका

विराट कोहलीच्या या फोटोमध्ये त्याचे घड्याळही दिसत आहे. त्यानंतर किंग कोहलीच्या घड्याळाकडे अनेक चाहत्यांच्या नजरा लागल्या. घड्याळ रोलेक्स कंपनीचे आहे. रोलेक्सच्या वेबसाइटवर असे आढळून आले की डेटन या मॉडेलची किंमत सुमारे करोड रुपये आहे. एवढेच नाही तर हे मॉडेल आपल्या आवडीनुसार बनवता येते. विराटने जी मॉडेल घातली आहे ती गोल्डन प्लेटेड आहे. विराटला महागड्या घड्याळांचा शौकीन मानला जातो. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.

virat kohli rolex watch price wearing when
T20 World Cup: रोहित शर्मा अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला रवाना, 15 वर्षांचा दुष्काळ संपणार!

टीम इंडिया 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. आयसीसीने आयोजित केलेल्या सराव सामन्यांसाठी ब्रिस्बेनला जाण्यापूर्वी संघ पर्थमध्ये आपापसात काही सामने खेळेल.

  • ICC T20 विश्वचषकासाठी असा असणार भारतीय संघ:

    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

  • राखीव खेळाडू

    मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com