क्रोएशियावरील विजयाने भारताचे आव्हान कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

मुंबई - अनुभवी शरथ कमलच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतील प्लेऑफच्या आशा कायम राखल्या. भारताने ०-२ पिछाडीनंतर क्रोएशियाला हरवले. 

स्वीडनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत शरथ कमल सुरवातीला जागतिक क्रमवारीत ३९ वा असलेल्या आंद्रेज गासिनाविरुद्ध पराजित झाला. त्यानंतर जी. साथीयनही चार गेमच्या लढतीत पराजित झाला. हरमित देसाईने प्रतिकार सुरू केला. त्यानंतर साथीयन आणि शरथने परतीच्या लढती जिंकत भारतास विजयी केले. आता भारताने ऑस्ट्रियास हरवले आणि कोरिया आणि फ्रान्सनेही बाजी मारली; तर भारतास अखेरच्या १६ संघांत स्थान मिळू शकेल.

महिला संघाची पराभवाची मालिका कायम राहिली. मौमा दास, मनिका बत्रा आणि मधुरिका पाटकरसाठी विजय दुरावरतच राहिला. भारतीय महिला संघ आता १३ ते २४ क्रमांकासाठी खेळणार आहे.

Web Title: table tennis competition