टेबल टेनिस संघ जागतिक स्पर्धेसाठी रवाना

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नवी दिल्ली  - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ऐतिहासिक यशामुळे आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय टेबल टेनिस संघ जागतिक अजिंक्‍यपद टेबिल  टेनिस स्पर्धेसाठी बुधवारी स्वीडनला रवाना झाला. ही स्पर्धा २९ एप्रिल ते ६ मेदरम्यान पार पडणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेला संघच भारताने कायम ठेवला आहे. शरथ कमालकडे भारतीय संघाचे नेतृत्व  असून त्याने या स्पर्धेत कामगिरी आणि मानांकन उंचावण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. भारतीय पुरुष संघ दहाव्या,  तर महिला चौदाव्या स्थानावर आहेत. 

Web Title: Table Tennis team departs for world tournaments