Video राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तमिळनाडू, छत्तीसगड, महाराष्ट्र अव्वल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

राष्ट्रीय शालेय बास्केटबाॅल स्पर्धेचा समाराेप माेठ्या उत्साहात झाला. यावेळी शानभाग विद्यालयाच्या विद्याथ्यार्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची लाेककला सादर केली. 

सातारा : येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल (17 वर्षांखालील मुली) स्पर्धेत तमिळनाडू संघाने छत्तीसगड संघाचा अवघ्या एका गुणाने पराभव करीत विजेतेपदाचा करंडक पटकाविला.

हेही वाचा -  Video देशातील शाळांमध्ये फिट इंडियाची धूम

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व के. एस. डी. शानभाग विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने शानभाग विद्यालय येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय आंतरशालेय बास्केटबॉल (17 वर्षांखालील मुली) क्रीडा स्पर्धेतील अंतिम सामना तमिळनाडू विरुध्द छत्तीसगड या राज्यांमध्ये झाला.

क्षणा क्षणाला उत्कंठा वाढविणाऱया या सामन्यात तमिळनाडू संघाने अखेरच्या तीन सेकंदात दाेन गुणांचा बास्केट नाेंदवित 71-70 असा विजय मिळविला. 

हेही वाचा - राष्ट्रीय बास्केटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने गाठली उपांत्य फेरी

या स्पर्धेत छत्तीसगड राज्याने द्वितीय स्थान मिळविले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यामध्ये महाराष्ट्र राज्याने उत्तम कामगिरी करीत राजस्थानच्या संघावर 68-50 अशा गुणांनी विजय संपादन केला.

सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात छत्तीसगड संघाकडून महाराष्ट्र संघास पराभवास सामाेरे जावे लागले. तमिळनाडू संघाने राजस्थान संघाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला हाेता. 

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवछत्रपती पुरस्कार्थी प्राची थत्ते यांच्या हस्ते शामसुंदरी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक रमेश शानभाग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. जाधव यांच्या प्रमुख उपस्थित झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil Nadu Girls Basketball Team Won Against Chhattisgarh In Final Of School National Basketball Championship