मिताली राजच्या बायोपिकमध्ये झळकणार तापसी पन्नू

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यात येणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मितालीची भूमिका साकारणार आहे.

मुंबई : बॉलिवूमध्ये सध्या खेळाडूंच्या बायोपिकचं वारं आहे. मिल्खा सिंग, महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर यांच्यावर यापूर्वीच बायोपिक बनले आहेत. तसेच रणवीरसिंहही 1983च्या विश्वकरंडकाच्या चित्रपटावर काम करत आहे ज्यामध्ये तो माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका करणार आहे. या साऱ्या बायोपिक्समध्ये आता आणखी एका मोठ्या क्रिकेटपटूवर चित्रपट येणार आहे. 

व्वा मानलं तुला! एकही धाव न देता घेतले सहा बळी

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर चित्रपट काढण्यात येणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मितालीची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाचे नाव 'शाबाश मीतू' असे असणार आहे. हा चित्रपट व्हायकॉम 18 तर्फे निर्मित करण्यात येणार आहे. मिताली राजचा आज वाढदिवस आहे आणि हेच औचित्य साधून तापसीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ही बातमी सर्वांना सांगितली आहे. 

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tapsee Pannu to act in Biopic of Mithali Raj