राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेबाबत रविवारी निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई - राज्य बुद्धिबळ संघटनेची संलग्नता रद्द होण्याबाबतचा निर्णय येत्या रविवारी होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अखिल भारतीय संघटनेच्या मध्यवर्ती परिषदेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. आता पुन्हा मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे सांगितले जात आहे.

राज्य बुद्धिबळ संघटनेस, संघटनेतील गैरव्यवहारांबद्दल अखिल भारतीय महासंघाने 12 सप्टेंबरला नोटीस बजावली होती. त्यात नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत दिली होती. राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मुदत वाढवून घेतली. आता ही मुदत संपली असली, तरी त्याबाबतचा प्रश्न मिटलेला नाही.

राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष; तसेच भारतीय संघटनेचे खजिनदार रवींद्र डोंगरे यांनी एका पत्रकार परिषदेत याबाबतचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत बैठका होत आहेत; पण अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना नियमानुसारच निर्णय घेईल, असे सांगितले. त्याचवेळी राज्यात गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी पन्नास स्पर्धा घेतल्या आहेत. स्पर्धा घेणाऱ्यांत महाराष्ट्र सर्वांत आघाडीवर असल्याचेही सांगितले.

शनिवारी प्रयत्न होणार
दरम्यान, राज्यातील बुद्धिबळ अभ्यासकांचा हा वाद मिटवण्यासाठी बैठका होतात; पण आवश्‍यक असलेली अधिकृत सभा होत नाही. ती झाल्यावरच अधिकृत उत्तर देता येईल, असे सांगत आहेत. एका पदाधिकाऱ्याने आपले नाव छापण्याच्या अटीवर, या आठवड्याच्या अखेर बैठक ठरली आहे. शनिवारी होणाऱ्या या बैठकीनंतर चांगले घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र त्याचवेळी होप फॉर दी बेस्ट, अँड... असेही एका अभ्यासकाने सांगितले.

Web Title: tate Chess Association on Sunday decided