
आमच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी विराटने ऑगस्ट २०२० मध्येच दिली होती.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याच्या घरी एका लहान परीचं आगमन झालं आहे. याची माहिती त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर विराट पितृत्वाची रजा घेऊन भारतात परतला होता. तो सध्या पत्नी अनुष्का आणि मुलीसोबत वेळ घालवत आहे. नुकतंच त्याने आपल्या ट्विटर बायोदेखील बदलला आहे. आणि याचमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे.
- 'पडोसन'ला इम्प्रेस करण्यासाठी विराट घेतोय धोनीचा सल्ला; पाहा व्हिडिओ!
विराटने ट्विटर अकाउंटच्या बायोमध्ये भारतीय क्रिकेटर, खेळाडू, फुटबॉल प्रेमी, कार लव्हर आणि उत्साही असा उल्लेख केला होता. तोच बायो आता त्याने बदलला आहे. जुना बायो पूर्ण डिलीट केला असून 'अभिमानी पती आणि बाप' असा नवीन बायो लिहला आहे. तसेच हृदयाचे इमोजीदेखील जोडले आहे.
- IND VS AUS - भारतीय गोलंदाजाने स्पॉट फिक्सिंग केल्याची शंका; शेन वॉर्न झाला ट्रोल
क्रिकेटपटू विराट ११ जानेवारीला बापमाणूस झाला. विराटने सोमवारी दुपारी आम्हाला (अनुष्का आणि मला) मुलगी झाली. तुम्ही सर्वांनी शुभेच्छा आणि प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. अनुष्का आणि बाळाची तब्येत ठीक आहे. आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरवात करण्यास उत्सुक आहोत आणि आमच्या खासगी जीवनाचा आदर केला जाईल, असंही त्यानं म्हटलं आहे.
आमच्या घरी नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी विराटने ऑगस्ट २०२० मध्येच दिली होती. त्यानंतर त्याने बीसीसीआयकडून पितृत्वाची रजा मागितली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे, टी-२० आणि एक कसोटी सामना खेळून तो मायदेशी परतला होता.
- पहिलं 'कन्या' रत्न लाभलेली, क्रिकेटमधली 'बाप' माणसं!
सध्या तो अनुष्का आणि बाळासोबत वेळ घालवत आहे. हे सुंदर क्षण गमवण्याची इच्छा नाही, असंही त्यानं म्हटलं आहे. विराट आणि अनुष्काचे १० डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न झालं होतं. त्यावेळी जवळचे नातेवाईक आणि मित्र एवढेच लग्नाला उपस्थित होते.
3 years and onto a lifetime together pic.twitter.com/a30gdU87vS
— Virat Kohli (@imVkohli) December 11, 2020
- क्रीडा क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)