esakal | रोहित-धवन-राहुल यांच्यातली स्पर्धा ही सकारात्मक, पण...!
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Shikhar-Rahul

शिखरने एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली आहे आणि राहुल सध्या उत्तम फॉर्मात आहे. त्यामुळे आम्हाला यावर तोडगा काढावा लागेल.

रोहित-धवन-राहुल यांच्यातली स्पर्धा ही सकारात्मक, पण...!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. मात्र, रोहित शर्मासोबत सलामीला कोणता फलंदाज खेळणार हा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सध्या सतावत आहे.

रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल हे तिघेही सध्या चांगल्या फॉर्मात असल्याने त्यांच्यातील स्पर्धा सकारात्मक असल्याचे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिन्ही सलमीवीर चांगला खेळ करत असल्याने कोणाची निवड करायची अशा कोंडीत संघ व्यवस्थापन सापडले आहे. मात्र, ही कोंडी चांगली असल्याचे मत राठोड यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "ही चांगलीच कोंडी आहे. सलामीला रोहित खेळणार हे निश्चित आहे. शिखर आणि राहुल दोघेही चांगले खेळत आहेत. शिखरने एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केली आहे आणि राहुल सध्या उत्तम फॉर्मात आहे. त्यामुळे आम्हाला यावर तोडगा काढावा लागेल." 

- वर्ल्ड कपमधील 'त्या' गोष्टीचा आजही पश्चाताप होतो : धोनी

श्रीलंकेविरूद्ध नुकत्याच झालेल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत संघात पुनरागमन करणारा धवनने चांगली खेळी केली आहे. राहुलही उत्कृष्ट खेळत आहे. 

इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरडंकात रोहितने पाच शतके झळकाविली होती. भारतीय संघ 14 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरवात करत आहे. या मालिकेत सलामीची जोडी कशी असेल याबाबत बोलताना ते म्हणाले, ''ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोणाला संधी मिळणार याचा निर्णय निवड समिती घेईल. मालिकेला अजूनही काही दिवस आहेत.''

- बुमरा, पुनम यादवला बीसीसीआयचे प्रतिष्ठेचे पुरस्कार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेचा टी20 विश्वकरंडकाच्या तयारीत कसा फायदा होईल याबद्दल विचारले असता राठोड म्हणाले, "आम्ही आता वेगळ्या प्रकारचे क्रिकेट खेळणार आहोत. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये बराच फरक असतो. क्रिकेट हा आत्मविश्वासाचा खेळ आहे. फलंदाज आणि गोलंदाज म्हणून आपण ऑस्ट्रेलियासारख्या जगातील सर्वोत्तम संघापैकी एका संघाविरुद्ध खेळत असू तर त्यामुळे तुमच्या खेळात नक्कीच प्रगती होते. यामुळे तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो."

- T20 World Cup : भारतीय संघाची घोषणा; 15 वर्षीय क्रिकेटपटूचा समावेश

मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना - 14 जानेवारी - मुंबई
दुसरा सामना - 17 जानेवारी - राजकोट
तिसरा सामना - 19 जानेवारी - बंगळूर