INDvsWI : अरेरे...'टीम इंडिया' झेल घेण्यास तर विसरली नाही ना?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

वेस्ट इंडिजच्या डावाच्या 31 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पंतने स्टम्पिंग करण्याची संधी सोडली.

नवी दिल्ली : क्रिकेट म्हटलं की, आपल्याला आठवतात ते आक्रमक फलंदाज, भेदक गोलंदाज आणि उत्तमक्षेत्ररक्षण करणारे खेळाडू, पण खरंच उत्तम क्षेत्ररक्षक आपल्याकडे आहेत का? आपल्याकडे म्हणजे टीम इंडियाकडे. अहो, त्याला कारणंही तसंच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात जरी टीम इंडियाने 107 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळविला असला, तरी क्षेत्ररक्षणाचं काय? जे सुधारण्याचे नाव घेतच नाहीत. विशेषत: वेस्ट इंडीज विरुद्ध टीम इंडिया प्रत्येक सामन्यात खराब क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे.

Image may contain: 1 person, playing a sport

विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला एक-दोन नव्हे, तर चार संधी दिल्या. टीम इंडियाने दुसर्‍या वनडेत तीन कॅच सोडले, तर पंतने स्टंपिंगची संधी सोडली. 

- IPL 2020 : जगातला भारी खेळाडू अन् राहिला UNSOLD!

Image may contain: one or more people and outdoor

वेस्ट इंडिजच्या डावाच्या 31 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पंतने स्टम्पिंगची चूक केली. कुलदीप यादवच्या झेंडूवर होपला स्टम्पिंग करण्यात चूक केली. पुढे कर्णधार कोहलीने सुद्धा एक झेल सोडला, पण तसा तो अवघडच होता. 

- IPL 2020 : पंजाबचा बॅटींग कोच झाला आता नवा कर्णधार पाहा!

विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाची फिल्डिंग पहिल्या ओव्हरपासून खराब झाली. दीपक चहर, के एल. राहुल यांनी झेल सोडले.

Image may contain: 1 person, playing a sport and outdoor

टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण वारंवार ढासळत चाललेले दिसत आहे. वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये इंडियाने एक दोन नव्हे, तर तब्बल 15 झेल सोडले आहेत. 
म्हणजेच प्रत्येक सामन्यात टीम इंडियाने सरासरी 3 झेल सोडले आहेत. 

युवीने जाहीर केली नाराजी

भारतीय संघाचा तडाखेबंद फलंदाज आणि जागतिक क्रिकेटविश्वात ज्याची उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गणना केली जाते, अशा युवराज सिंगने टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ''तरुण खेळाडूंकडून ही अपेक्षा नाही. अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे, त्यामुळे याकडे थोडं गांभीर्याने पाहा,'' असं युवीनं म्हटलं आहे.

Image may contain: 1 person

जर असे क्षेत्ररक्षण कायम राहिले, तर पुढच्या वर्षी टी-20 विश्वकरंडक जिंकणं अवघड जाईल. त्यामुळे कुणी टीम इंडियाला झेल घ्यायला शिकवता का? असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

- INDvWI : धावांचा हिमालय त्यावर हॅटट्रिकचा कळस; भारताची मालिकेत 1-1 बरोबरी

Image may contain: one or more people, beard and text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team India dropped catches against West Indies in T20 and ODI