“मॅच आधी Sex करा”, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील किस्सा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

“मॅच आधी Sex करा”, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील किस्सा

टीम इंडियाचे (Team India) माजी मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन (Paddy Upton) यांच्या एका खुलास्याने क्रिकेट जगताला आश्चर्यचकित करुन सोडले आहे. भारतीय क्रिकेट टीम (Team India) च्या दाव्यानुसार आपल्या कारकिर्दीत त्यांनी टीम इंडियाततील खेळाडूंना मॅचपूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता. पॅडी अप्टन (Paddy Upton) यांच्या ‘द बेयरफुट कोच’ या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे.

माजी मेंटल कंडीशनिंग कोच राहिलेल्या पॅडी यांनी टीम इंडियातील खेळाडूंना सामन्यापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता. ही गोष्ट तत्कालीन मुख्य कोच गॅरी कस्टर्न यांना पटली नव्हती. गॅरी कस्टर्न यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पॅडी अप्टन यांनी माफीही मागितली होती. गॅरी कस्टर्न यांच्या मार्गदर्शनाखालीच टीम इंडियाने 2011 मध्ये वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.

सेक्ससंदर्भातील मुद्यावरुन उठले होते वादंग

मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अप्टनच्या म्हणण्यानुसार, ‘द वॉल’ राहुल द्रविड पासून ते गौतम गंभीर या सर्व खेळाडूंसमोर या विषयावर चर्चा केली होती. 2009 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या तयारी वेळी टीम इंडियातील खेळाडूंसाठी त्यांनी नोट्स काढल्या. यावेळी त्यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचे फायदे यासंदर्भात सविस्तर मुद्दा मांडला होता.

शारीरिक संबंध ठेवल्याने खेळातील कामगिरी उंचावते?

पॅडी यांनी आपल्या पुस्तकातील ‘ईगो अँण्ड माय ग्रेटेस्ट प्रोफेशनल एरर’ या प्रकरणात या वादग्रस्त ठरलेल्या मुद्द्याचा उल्लेख केलाय. त्यांनी खेळाडूंसाठी तयार केलेल्या नोट्समध्ये शारिरीक संबंधानंतर कामगिरीत सुधारणा होते, असे म्हटले होते. खेळाडूंना हा सल्ला देणं माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक असल्याचेही अप्टन यांनी कबुल केले आहे.

loading image
go to top