INDvsBAN : जिंकलो, हारलो तरी टीम इंडिया उद्या रचणार इतिहास!

वृत्तसंस्था
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

- भारत खेळणार ट्वेंटी20 क्रिकेटमधील 1000वा सामना
- उद्या होणार दोन ट्वेंटी20 सामने 
- न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना 999वा सामना 

नवी दिल्ली : टीम इंडियासाठी उद्याचा दिवस ऐतिहासिक असेल. राजधानी दिल्लीत भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना हा ट्‌वेन्टी-20 मधील एक हजारावा सामना असणार आहे. आणि ते खेळण्याचे भाग्य भारतासह बांगलादेशलाही मिळणार आहे. उद्या दोन ट्‌वेन्टी-20 सामने होणार आहे.

मला तुझी खूप आठवण येतीये; हार्दिकचा फोटो व्हायरल

यातील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये होत आहे. हा सामना न्यूझीलंडमध्ये होत असल्यामुळे तो 999 वा सामना असेल. 

पहिला ट्‌वेन्टी-20 सामना फेब्रुवारी 2005 मध्ये खेळण्यात आला त्यानंतर 2007 मध्ये टी-20ची पहिली विश्‍वकरंडक स्पर्धा झाली होती. या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत भारतीय संघ केवळ एकच सामना खेळलेला होता.

INDvsBAN : 19 वर्षांचा गोलंदाज पडला रोहित-शिखरवर भारी

Image

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तो पहिला सामना भारताने जिंकलेला होता त्या सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला होता. सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला तो एकमेव आंतरराष्ट्रीय टी-20 समना आहे.

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team India to play worlds 1000th T20 in Overall international T20 cricket