Team India: WTC फायनलमध्ये KL राहुलचा समावेश कितपत योग्य? शेवटच्या 10 डावात फक्त 25 धावा अन्... | KL Rahul | Cricket News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kl rahul

Team India: WTC फायनलमध्ये KL राहुलचा समावेश कितपत योग्य? शेवटच्या 10 डावात फक्त 25 धावा अन्...

Team India : आयपीएलच्या या शानदार हंगामात चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. वास्तविक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. जो आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे काही काळ खराब कामगिरी असतानाही केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे.

केएल राहुल गेल्या काही काळापासून टीम इंडियासाठी खराब कामगिरी करत आहे. केएल राहुलने दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी शेवटची कसोटी खेळली, जिथे त्याला पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात 1 धाव करता आली. केएल राहुलच्या बॅटने शेवटचे शतक 2021 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आले होते. त्याने 123 धावांची इनिंग खेळली होती. या शतकानंतर त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ 50 आहे.

केएल राहुलच्या कसोटीतील शेवटच्या 10 डाव:

  • 12 धावा वि दक्षिण आफ्रिका (2022)

  • 10 धावा वि दक्षिण आफ्रिका (2022)

  • 22 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)

  • 23 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)

  • 10 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)

  • 2 धावा विरुद्ध बांगलादेश (2022)

  • 20 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023)

  • 17 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023)

  • 1 धाव विरुद्ध ऑस्ट्रेलिया (बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023)

गेल्या 10 डावांवर नजर टाकली तर केएल राहुलने आतापर्यंत एकूण 117 धावा केल्या आहेत. गेल्या 10 डावांमध्ये केएल राहुलने 11.7 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे जी खूप वाईट आहे. त्याने 25 धावांचा आकडाही गाठलेला नाही. केएल राहुल आयपीएल 2023 मध्ये चांगली फलंदाजी करत आहे. पण त्याचा स्ट्राईक रेट खूपच खराब आहे. केएल राहुलची निवड करून निवडकर्त्यांनी योग्य की चूक केली हे येणारा काळच सांगेल.