World Cup 2019 : भारतीय संघात एक नाही तर तीन अतिरिक्त गोलंदाज

सोमवार, 15 एप्रिल 2019

जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात तीन प्रमुख गोलंदाजांसह एक नाही तर तीन अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यात येणार आहे. 

वर्ल्ड कप 2019 : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात तीन प्रमुख गोलंदाजांसह एक नाही तर तीन अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यात येणार आहे. 

''विश्वकरंडकासाठी प्रमुख तीन गोलंदाजांना संघात स्थान दिले जाईल. मात्र, दुखापत आणि सराव सत्रात गोलंदाजी करणे अशा गोष्टींचा विचार करुन भारतीय संघात तीन अतिरिक्त गोलंदाजांचाही समावेश करण्यात येणार आहे,'' अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. 

बीसीसीआयने घेतलेला हा निर्णय काही नवा नाही. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्या दरम्यान महंमद सिराज आणि अवेश खान यांना सराव सत्रात गोलंदाजी करण्यासाठी संघासोबत पाठविण्यात आले होते. तसेच आशिया कप सुरु असताना पाच गोलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये फिरकीपटू शाहबाज नदीम, मयांक मार्कंडे, वेगवान गोलंदाज अवेश, प्रसिद्ध कृष्णा आणि सिद्धार्थ कौल यांचा समावेश होता. 

विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची निवड आज तीन वाजता मुंबईमध्ये केली जाणार आहे.