esakal | शाब्बास रे पठ्ठ्या! राष्ट्रीय कुडो बिग मिक्स मार्शल आर्टमध्ये तेजसला रौप्य
sakal

बोलून बातमी शोधा

शाब्बास रे पठ्ठ्या! राष्ट्रीय कुडो बिग मिक्स मार्शल आर्टमध्ये तेजसला रौप्य

या स्पर्धेत भारतातील २५ राज्यांमधील तब्बल १ हजार ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा २ ते ७ सप्टेंबर अशी पाच दिवस चालली.

शाब्बास रे पठ्ठ्या! राष्ट्रीय कुडो बिग मिक्स मार्शल आर्टमध्ये तेजसला रौप्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : राष्ट्रीय कुडो बिग मिक्स मार्शल आर्ट स्पर्धेत सिंधुदुर्गचा सुपुत्र तेजस भालचंद्र सुर्वे याने रौप्य पदक पटकावले. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने हिमाचल प्रदेश येथील सलोन येथे ही स्पर्धा नुकतीच पार पाडली. तो मूळचा नेर्ले (ता. वैभववाडी) येथील आहे. माजगाव येथील त्याचे मामा बंड्या चौगुले यांच्याकडे त्याचे शिक्षण झाले.

या स्पर्धेत भारतातील २५ राज्यांमधील तब्बल १ हजार ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा २ ते ७ सप्टेंबर अशी पाच दिवस चालली. या स्पर्धेत २१ वर्षांवरील पुरुष गटात कुडो फायटर्स म्हणून तेजस सुर्वे याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. तो सध्या पुणे दळवीनगर येथील गोल्डन ड्रॅगन मार्शल आर्ट या संस्थेत आहेत. या स्पर्धेसाठी सुर्वे याला पुणे जिल्हा कुडो संघटनेचे अध्यक्ष अरविंद मोरे, सचिव राहुल पवार, सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे आकिदो असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक वसंत जाधव (सावंतवाडी) यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: उत्तर प्रदेशात जाताय? बुंदेलखंडच्या 'या' ठिकाणांना जरूर भेट द्या

१० वर्षांपासून ज्यूदो, कराटे सारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हास्तरावर चमक दाखविली असून काही राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी यश संपादन केले आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल ज्यूदो, कराटे, अकिदो, मार्शल आर्ट्स क्षेत्रातील अनेक वरिष्ठ मार्गदर्शक, प्रशिक्षक, खेळाडू तसेच राजकीय पदाधिकारी आणि मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

'ब्लॅक बेल्ट'चाही मानकरी

तेजस सुर्वे यापूर्वी आंतरराष्ट्रीय निप्पोन कुडो सोगो स्पर्धेत ब्लॅक बेल्टचा मानकरी ठरला होता. पुणे येथील जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय कुडो स्पर्धेमध्ये त्याने सुवर्ण पदक पटकाविले होते.

हेही वाचा: झोपण्यापूर्वी करा मेकअप Remove; अन्यथा असे होऊ शकते नुकसान

loading image
go to top