पीवायसीवर उद्यापासून प्रकाशझोतात टेन पासेसची रंगत

पीवायसीवर उद्यापासून प्रकाशझोतात टेन पासेसची रंगत

पुणे - ऑस्ट्रेलियात जन्म झालेल्या, हॅंडबॉल-बास्केटबॉलशी साधर्म्य असलेल्या, तंदुरुस्ती उंचावणाऱ्या टेन पासेस या आगळ्या खेळाची स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखान्याच्या मैदानावर गुरुवारपासून रंगणार आहे.

फिटनेस ट्रेनर महेंद्र गोखले यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात क्रिकेटने पहिल्यांदा हा खेळा सुरू केला. त्यातून समन्वय, चपळताही वाढते. भारतात २००० पासून इतर काही खेळांत तसेच काही रणजी सामन्यापूर्वी हा खेळ होतो. कोणत्याही वयाचे स्त्री-पुरुष मोठी खोली, गच्ची, बागेत किंवा पार्किंगमध्ये खेळू शकतात.

खेळाचे स्वरूप
  मैदानाच्या मध्यभागी पंचांनी चेंडूचा एक टप्पा पडून दिला की सामना सुरू
  प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू अर्धवर्तुळातील आपापल्या जागेवर सज्ज
  एकाच टप्प्यात सहकारी खेळाडूला चेंडू पास करायचा
  पास देताना सहकारी खेळाडूचा जर्सी नंबर ओरडून सांगणे
  प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूही त्यानुसार चेंडूचा ताबा घेऊ शकतात
  तसा ताबा मिळाला तर त्यांनीसुद्धा याच पद्धतीने एकमेकांना पास द्यायचा
  चेंडूवर ताबा मिळवताना केवळ हाताचाच वापर
  एका संघाने दहा वेळा चेंडू पास केल्यावरच गोल करण्याची परवानगी
  चेंडू ताब्यात घेतला त्याच जागेवरच उभे राहून आणि कंबरेखालून चेंडू मारणे अनिवार्य
  शेवटी चेंडूवर ताबा मिळविलेल्या खेळाडूला गोलचा प्रयत्न करण्याची परवानगी
  चेंडू पूर्ण गोल पोस्टच्या पार गेला तरच एक गोल
  समान गोल केले झाल्यास पेनल्टी शूट आउट
  त्यात प्रत्येकी पाच शॉट्‌स
  गोलनंतर खेळ पुन्हा सुरू
  पंच मैदानाच्या मध्यभागी चेंडूचा टप्पा पाडतात

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com