Video : लिअँडर पेस उतरला पिंपरीतल्या टेनिस कोर्टवर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

बालेवाडी येथील एटीपी 250 टाटा खुल्या टेनिस स्पर्धेनिमित्त भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस, रामकुमार रामनाथन आणि अर्जुन कढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील सेक्‍टर 25 येथील लॉन टेनिसला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी, या तिघांनीही मुलांसमवेत टेनिस खेळण्याचा आनंद घेतला. तसेच त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड - बालेवाडी येथील एटीपी 250 टाटा खुल्या टेनिस स्पर्धेनिमित्त भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस, रामकुमार रामनाथन आणि अर्जुन कढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील सेक्‍टर 25 येथील लॉन टेनिसला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी, या तिघांनीही मुलांसमवेत टेनिस खेळण्याचा आनंद घेतला. तसेच त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तत्पूर्वी, खेळाडू आणि पालकांशी सुसंवाद साधताना पेस म्हणाले, 'देशासाठी खेळणे माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब राहिली. चालू वर्षी मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होत आहे. परंतु, नव्या भूमिकेत मी तुमच्यासमोर येईन. माझ्या खेळात उत्कृष्ट तंत्राचा अभाव राहिला. परंतु, कठोर मेहनत घेतली. त्यामुळे, तुम्ही देखील कठोर परिश्रम आणि स्वतःवर विश्‍वास ठेवल्यास यशाच्या शिखरावर पोचल्याशिवाय राहणार नाही.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tennis player leander paes teaches lesson to players in pimpri chinchwad