देशातील टेबल टेनिस क्षेत्रात क्रांती घडावी - मनिका बात्रा

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीत टेबल टेनिसपटू मनिका बात्राची कामगिरी लक्षवेधक ठरली. आपल्या या कामगिरीने देशातील टेबल टेनिसमध्ये क्रांती घडावी, अशी आशा तिने मंगळवारी मायदेशी परतल्यावर व्यक्त केली.

राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने सहभाग घेतलेल्या चारही प्रकारात पदकाची कमाई केली. ती म्हणाली, ‘‘ही कामगिरी नक्कीच लक्षवेधक आणि आनंदी आहे. त्यापेक्षा साईना आणि सिंधूच्या कामगिरीनंतर ज्या झपाट्याने भारतीय बॅडमिंटनची प्रगती झाली, त्याप्रमाणे आपल्या कामगिरीने देशातील टेबल टेनिसमधील प्रगती व्हायला हवी.’’

Web Title: Tennis player Manika Batra