मनोजकुमारची आगेकूच; शिवा, विकासचा पराभव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नवी दिल्ली - भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता बॉक्‍सिंग खेळाडू मनोज कुमार याने थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्‍सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्या विकास कृष्णन आणि शिवा थापा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बॅंकॉक येथे सुरू असलेल्या स्पर्धेत 69 किलो वजनी गटातून मनोजने व्हिएतनामच्या हुयीन्ह न्गोक विएन याचा पराभव केला. त्याच्याबरोबर रोहित टोकस (64 किलो) आणि के. श्‍यामकुमार (49किलो) यांनीदेखील आगेकूच कायम राखली.

रोहितने ऑस्ट्रेलियाच्या मुहंमद डेमिर्काया, तर श्‍यामने यजमान थायलंडच्या थानी नारिन्राम यांचा पराभव केला. यापूर्वी 2015 मध्ये याच स्पर्धेत श्‍यामने सुवर्ण, तर रोहितने ब्रॉंजपदक पटकावले होते.
आशियाई विजेत्या शिवा थापा आणि विकास क्रिशन, देवेंद्रो सिंग यांच्या पराभवाचा भारताला निश्‍चित धक्का बसला. शिवाला थायलंडच्या सोनचाय वोंगसुवान याच्याकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीत शिवाला डोळ्याच्या वरच्या बाजूला दुखापत झाली. ऑलिंपिकनंतर प्रथमच खेळताना विकासला जागतिक स्पर्धेतील ब्रॉंझपदक विजेत्या कझाकस्तानच्या अल्झानोव येरिक याच्याकडून पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील 52 किलो वजनी गटात देवेंद्रो सिंग याचेही आव्हान संपुष्टात आले. क्‍युबाच्या फ्रॅंक झाल्डीवार सॅंटिस्टेबा याने त्याचा पराभव केला.

Web Title: thailand internation boxing competition