ठाण्याच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मुंबई शहर तसेच उपनगर यांच्यासह ठाण्याने राज्य खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. सोलापूरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने हरिभाई देवकरण प्रशाला मैदानावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत शरणप्पा ढेपे यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा घेतली आहे. पुण्याच्या पुरुष संघाप्रमाणेच ठाणे महिला संघानेही सलामीची लढत जिंकली.

मुंबई  : मुंबई शहर तसेच उपनगर यांच्यासह ठाण्याने राज्य खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. सोलापूरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाने हरिभाई देवकरण प्रशाला मैदानावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत शरणप्पा ढेपे यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा घेतली आहे. पुण्याच्या पुरुष संघाप्रमाणेच ठाणे महिला संघानेही सलामीची लढत जिंकली.

मुंबईच्या पुरुष संघाने अपेक्षेनुसार औरंगाबादला एका डावाने हरवले; तर गतविजेत्या उपनगरने रत्नागिरीविरुद्ध डावानेच बाजी मारली आणि ठाण्याने नंदुरबारचे आव्हान डावानेच परतवले. ठाण्याच्या महिलांनी लातूरचा एका डाव आणि 20 गुणांनी धुव्वा उडवला; तर पुण्याच्या पुरुषांनी धुळ्याला प्रतिकाराचीही संधी दिली नाही.

निकाल, पुरुष- मुंबई ः 25 (श्रेयस राऊळ 3.30 मिनिटे, सुजय मोरे 2 मिनिटे, निखिल कांबळे 1.30 मिनिटे आणि 1 मिनीट तसेच चार गडी, शुभम शिगवणने 1.40 मिनिटे तसेच सात गडी, पियूष घोलम चार गडी) डावाने विजयी वि. औरंगाबाद ः 14 (राजपाल निकलजे 3 गडी, राहुल नाईकनवरे 3 गडी). उपनगर ः 20 (निहार दुबळे 2.50 मिनिटे नाबाद आणि 2 गडी, ऋषिकेश मुर्चावडे 2.50 मिनिटे आणि 3 गडी, हरेश मोरे 2.20 मिनिटे, प्रतीक देवरे 3 गडी, दुर्वेश साळुंके 3 गडी) वि. वि. रत्नागिरी ः 7. ठाणे ः 13 (महेश शिंदे 3 मिनिटे तसेच 1 गडी, संकेत कदम 3 मिनिटे आणि 3 गडी, सुहास पवार 3 मिनिटे आणि 2 गडी) वि. वि. नंदुरबार ः 9 (लक्ष्मण वसावे 4 गडी, श्रीराम कोकणी 2 गडी). पुणे ः 15 (सागर लेंगरे 3 मिनिटे आणि 1 गडी, अभिजित खेडेकर 3 मिनिटे आणि 1 गडी) वि. धुळे ः 8 (राहुल पवार 1.10 मि.). महिला- ठाणे ः 26 (रूपाली बडे 3.40 मिनिटे आणि 1 खेळाडू बाद, रेश्‍मा राठोड 3 मिनिटे आणि 2 खेळाडू बाद, मनोरमा शर्मा 2.10 मिनिटे आणि 3 खेळाडू बाद, पूजा फरगडे 7 खेळाडू बाद) वि. वि. लातूर ः 6 (अन्नपूर्णा महाराज 1.10 मिनिटे आणि 1 मिनीट, आरती पारसेवार 2 खेळाडू बाद).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane team won in state kho - kho championship