IND vs AUS : इंदूर कसोटीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या क्रीडा पत्रकाराचा हॉटेलमध्ये सापडला मृतदेह | Sports Journalist S Dinakar Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs AUS Sports Journalist S Dinakar Death

IND vs AUS : इंदूर कसोटीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या क्रीडा पत्रकाराचा हॉटेलमध्ये सापडला मृतदेह

IND vs AUS Sports Journalist S Dinakar Death : इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूचे वरिष्ठ क्रीडा उपसंपादक एस दिनकर यांचे इंदूर येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. ते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीचे वार्तांकन करण्यासाठी इंदूर येथे गेले होते.

प्रथमदर्शनी त्यांचा मृत्यू हा ह्रदय विकाराचा झटका आल्याने झाला असल्याचे दिसत आहे. याबाबतची माहिती मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी दिली.

एमपीसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की 57 वर्षाचे क्रीडा पत्रकार एक दिनकर हे विजय नगरच्या एका हॉटेलमधील रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. यानंतर त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासणीनंतर दिनकर यांचा मृत्यू हा ह्रदय विकाराच्या झटक्याने झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डीसीपी संपत उपाध्याय यांनी सांगितले की, वरिष्ठ क्रीडा पत्रकार मृत्यू प्रकरणी संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच याबाबत बोलता येईल.

दरम्यान, दिनकर यांच्या सहकाऱ्याने सांगितले की बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील इंदूर येथील तिसऱ्या कसोटीचे वार्तांकन केल्यानंतर अहमदाबादच्या चौथ्या कसोटीसाठी आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. दिनकर यांना मंगळवारी सकाळी अहदाबादला रवाना व्हायचं होतं.

दिनकर यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, दिनकर हे क्रिकेटचे सामना कव्हर करण्यासाठी जगभर फिरले आहेत. ते आपल्या शेवटच्या क्षणी देखील क्रिकेटबद्दलच लिहीत होते. इंदूरच्या होळकार काळातील क्रिकेटचा वारसा यावर एक लेख लिहित होते. हा लेख त्यांच्या निधनाच्या वृत्तासोबतच मंगळवारी प्रकाशित झाला.

बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी दिनकर यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, 'इंदूरच्या होळकर घराण्याच्या क्रिकेट संघाबाब, दिनकर यांनी सोमवारी माझ्याशी चर्चा केली होती. दिनकर हे मुलाखतीसाठी मला भेटायला येणार होते. मात्र नंतर त्यांनी फोनवरच बोलण्याचं ठरवलं.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर