...तर मेस्सीचा शर्ट, फोटो जाळा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

लिओनेल मेस्सी हा इस्राईलविरुद्धची लढत खेळला, तर त्याचे फोटो, टी-शर्ट जाळून टाका, असे आवाहन पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेच्या प्रमुखांनी केले आहे.
 

जेरुसलेम - लिओनेल मेस्सी हा इस्राईलविरुद्धची लढत खेळला, तर त्याचे फोटो, टी-शर्ट जाळून टाका, असे आवाहन पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेच्या प्रमुखांनी केले आहे.

अर्जेंटिना विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी इस्राईलविरुद्ध जेरुसलेमला सराव लढत खेळणार आहे. यामुळे इस्राईल चाहत्यात उत्साह आहे; पण त्याचवेळी पॅलेस्टाईनमध्ये संतापाची लाट आहे. पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेने थेट तुम्ही ही लढत इस्राईलला मान्यता असल्याचे दर्शवण्यासाठीच खेळत आहात, असा आरोप केला आहे. ही लढत पश्‍चिम जेरुसलेममध्ये होत आहे. पॅलेस्टाईन या शहराचा पूर्व भाग आपला आहे.

गाझा पट्टा आणि इस्राईलचा ताबा असलेला वेस्ट बॅंक हा भाग असलेल्या परिसराची राजधानी असेल, असे पॅलेस्टाईनने जाहीर केले आहे. 

Web Title: then burn Messi's shirt and photos