
आकडेवारी काहीही सांगत असली तरी महेंद्रसिंह धोनी याच्यापेक्षा सरस कर्णधार आहेत. धोनी हा काही सर्वोत्तम कर्णधार नाही, असे मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून धोनीच्या स्थानावरून क्रिकेट जगतात चर्चा झडली असताना गंभीरने तिन्ही प्रकारासाठी आधीच कर्णधारपद सोडलेल्या धोनीच्या नेतृत्वकौशल्याविषयी अनावश्यक विधान केले.
नवी दिल्ली : आकडेवारी काहीही सांगत असली तरी महेंद्रसिंह धोनी याच्यापेक्षा सरस कर्णधार आहेत. धोनी हा काही सर्वोत्तम कर्णधार नाही, असे मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून धोनीच्या स्थानावरून क्रिकेट जगतात चर्चा झडली असताना गंभीरने तिन्ही प्रकारासाठी आधीच कर्णधारपद सोडलेल्या धोनीच्या नेतृत्वकौशल्याविषयी अनावश्यक विधान केले.
तो म्हणाला की, "आकडेवारीनुसार धोनी आघाडीवर दिसतो. त्याने आपल्याला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले हे खरे आहे, पण सौरव गांगुली, अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांनी संघाला त्याहून जास्त उंचीवर नेले आहे. कुंबळेने कमा कालावधीसाठी नेतृत्व केले, पण ठसा उमटविला. राहुल द्रविडनेही इंग्लंडमध्ये विजय मिळवून दिला. ' गंभीर अलीकडेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा खासदार झाला आहे. त्याने राजकारणात शोभेल असे परस्परविरोधी विधानही केले. "सारे श्रेय धोनीला देणे योग्य नाही, पण जेव्हा काहीतरी खराब घडते तेव्हा सारा दोष त्यालाही देणे बरोबर नाही,' असा "रिव्हर्स स्वीप'च्यावेळी "ग्रीप' बदलतात तसा "षटकार' त्याने खेचला.
धोनीने देशाला 27 कसोटी विजय मिळवून दिले. त्याने आधीच्या सर्व कर्णधारांचे उच्चांक मोडले. आता विराटला त्याचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला दोन विजयांची गरज आहे.