चाहत्यांसाठी भीक मागण्याची गरज नाही - कॉन्स्टंटाइन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

मार्गदर्शक म्हणाले... 
- छेत्रीसाठी संस्मरणीय असलेला सामन्यात कोणी चूक करू नये, हीच प्रार्थना करीत होतो 
- दोन गोल, भारताचा विजय, छेत्रीसाठी ही लढत नक्कीच संस्मरणीय 
- पावसामुळे प्रतिकूल झालेल्या परिस्थितीतही जिंकल्याचा आनंद 
- एकही गोल स्वीकारला नाही, याचाही आनंद 
- नेमके कुठे चुकत आहे, हे खेळाडूंना विश्रांतीच्यावेळी सांगितले 
-आम्हाला जास्तीत जास्त सामने हवेत 
-आशियाई स्पर्धेत भारतीय संघास फायदा होईल 

मुंबई - गेल्या काही वर्षांत भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी चांगली होत आहे. भारताची लढत पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खरेतर झुंबड उडायला हवी. त्यासाठी भीक मागण्याची गरज नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारतीय फुटबॉल संघाचे मार्गदर्शक स्टीफन कॉन्स्टंटाइन यांनी केले. 

मुंबईत सुरू असलेल्या इंटरकॉंटिनेंटल फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्या वेळी चाहत्यांनी जवळपास पाठ फिरवली होती. त्यानंतर भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने आम्हाला शिव्या घाला; पण सामना बघण्यासाठी या, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत नऊ हजार क्षमतेचा मुंबई फुटबॉल एरिना सोमवारी हाऊसफुल झाला होता. छेत्रीची ही शंभरावी आंतरराष्ट्रीय लढत होती. त्यात त्याने दोन गोल करीत भारतास 3-0 असे विजयी केले. 

सामन्याच्या पत्रकार परिषदेत चाहत्यांच्या प्रतिसादाबाबत मत व्यक्त होणे अपेक्षितच होते. "राष्ट्रीय संघ खेळत आहे. त्याला प्रोत्साहित करण्यासाठी चाहत्यांनी मैदानात यावे. यासाठी आपण भीक मागण्याची गरज नाही, असे माझे पूर्वीपासून मत आहे. चाहत्यांचा प्रतिसाद अविश्‍वसनीय होता. ब्ल्यू टायगर्सच्या कट्टर पाठीराख्यांबरोबरच अन्य चाहत्यांनीही यायला हवे. राष्ट्रीय संघ गेली तीन-साडेतीन वर्षे चांगली कामगिरी करीत आहे. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर चाहते येत नाहीत. त्यामुळे निराश होतो. आज मैदानात आलेल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. स्पर्धेतील उर्वरित दोन लढतींसाठीही त्यांनी यावे, हीच माझी अपेक्षा आहे,' असे भारतीय मार्गदर्शक स्टीफन कॉन्स्टंटाइन यांनी सांगितले. 

मार्गदर्शक म्हणाले... 
- छेत्रीसाठी संस्मरणीय असलेला सामन्यात कोणी चूक करू नये, हीच प्रार्थना करीत होतो 
- दोन गोल, भारताचा विजय, छेत्रीसाठी ही लढत नक्कीच संस्मरणीय 
- पावसामुळे प्रतिकूल झालेल्या परिस्थितीतही जिंकल्याचा आनंद 
- एकही गोल स्वीकारला नाही, याचाही आनंद 
- नेमके कुठे चुकत आहे, हे खेळाडूंना विश्रांतीच्यावेळी सांगितले 
-आम्हाला जास्तीत जास्त सामने हवेत 
-आशियाई स्पर्धेत भारतीय संघास फायदा होईल 

Web Title: There is no need to beg for fans says Constantine