World Cup 2019 : आज मॅंचेस्टरमध्ये पावसाची शक्यता 0 टक्के

World Cup 2019 : आज मॅंचेस्टरमध्ये पावसाची शक्यता 0 टक्के

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचा निकाल पावसामुळे आज बुधवारवर ढकलला गेला आहे. आज राखीव दिवशी पुढील सामना खेळविला जाणार आहे. मात्र, आजचा सामनाही पावसामुळे वाया जाण्याची भिती चाहत्यामध्ये आहे. मात्र, घाबरु नका, आज मॅचेस्टरमध्ये पावसाची शक्यता 0 ते 12 टक्के वर्तविण्यात आली आहे. 

आजचा पूर्ण दिवस मॅंचेस्टरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. मात्र, अधूनमधून सूर्याचे दर्शन होईल. त्यामुळेच आजच्या क्रिकेटचा वेरी मानल्या जाणाऱ्या डकवर्थ लुईस पद्धतीने सामन्याचा निकाल लावला जाणार नाही. 

कसे आहे आजच्या सामन्याचे गणित?

- न्यूझीलंडचा डाव ४६.१ षटकापासून सुरु होणार

- पूर्ण ५० षटकांचा खेळ होण्यास प्राधान्य.

-न्यूझीलंडचा डाव झाल्यास आणि त्यानंतर पाऊस आल्यास डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे षटके कमी करून नवे आव्हान तयार होईल.

-कमीत कमी भारताच्या डावाची २० षटके खेळवण्याचा प्रयत्न, तसे न झाल्यास भारत अंतिम फेरीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com