सह्याद्री प्रशालेला तीन सुवर्णपदके

3nov16-tykondo
3nov16-tykondo

पुणे - स्कूलिंपिक्‍स २०१६ स्पर्धेतील तायक्वाँदो क्रीडा प्रकारात पहिल्याच दिवशी १२ वर्षांखालील गटात सह्याद्री प्रशालेने तीन सुवर्णपदकांसह चार ब्राँझ अशी एकूण सात पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. 

खराडी येथील पाठारे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यांच्या प्रशालेच्या रोशन बेडमुथा (२१ किलो), नवीन भोगे (२७ किलो) आणि अनिरुद्ध बांदल (३२ किलो) यांनी सुवर्ण, तर विविध वजनी गटांतून ब्रिजेश यादव, स्वराज पवार, सिद्धार्थ कुंभार आणि अथर्व लुडबे यांनी ब्राँझपदके मिळविली.
१२ वर्षांखालील पदक विजेते (अनुक्रमे सुवर्ण, रौप्य, ब्राँझ)

२१ किलो ः रोशन बेडमुथा (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे), सार्थक काकडे (स्प्रिंग डेल, वडगाव), तुनष पाचपुते (स्प्रिंग डेल, वडगाव), प्रेम जगताप (स्प्रिंग डेल, आंबेगाव) २३ किलो ः यश कुंभार (स्प्रिंग डेल,वारजे), ओमकार कामठे (नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल, फुलगाव), सुदर्शन चौधरी (बोस मिलिटरी स्कूल, फुलगाव), सिद्धार्थ कुंभार (स्प्रिंग डेल,वारजे) २५ किलो ः मल्हार चोरगे (स्प्रिंग डेल, वडगाव), ओम दुर्गे (विजयमाला विद्यामंदिर, शिरूर), प्रीतम एधाते (खंडोजी चव्हाण प्रशाला, धायरी), अथर्व लुडबे (सह्याद्री स्कूल, वारजे) २७ किलो ः नवीन बोघे (सह्याद्री स्कूल, वारजे), तनिष्क गोरे (विद्या व्हॅली, सुसगाव), वेदांत आढाव (स्प्रिंग डेल, वारजे), कार्तिक भिसे (एसएसपीएमएस डे) २९ किलो ः अनुज शिंगाडे (स्प्रिंग डेल, आंबेगाव), अक्षय वैद्य (स्प्रिंग डेल, वडगाव), ब्रीजेश यादव (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे), हिमालय आवटे (एसएसपीएमएस बोर्डिंग) ३२ किलो ः अनिरुद्ध बांदल (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे), सोहेल शेख (वालनट, शिवणे), साहिल खराटे (महेश विद्यालय, कोथरूड), तन्मय पाडेकर (ज्ञानगंगा इंग्रजी माध्यम, हिंगणे) ३५ किलो ः ऋग्वेद जोगळेकर (स्प्रिंग डेल, आंबेगाव), अन्वय खाडे (आर्यन्स वर्ल्ड स्कूल, कात्रज), स्वराज पवार (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे), आयुष ओहळ (ज्ञानप्रबोधिनी, पुणे).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com