VIDEO : साउदीच्या सिक्सरनं चाहत्याला दुखापत

IND vs NZ
IND vs NZTwiteet

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (World Test Championship) न्यूझीलंडने पहिल्या डावात 249 धावा केल्या. भारतीय संघाने केलेल्या धावांचा टप्पा पार करुन त्यांनी मोजक्या पण उपयुक्त 32 धावांची आघाडी घेतली. ही अल्प आघाडी मिळवून देण्यात किवी गोलंदाज टिम साउदीची (Tim Southee) फटकेबाजी महत्त्वपूर्ण ठरली. साउदीने 46 चेंडूत 30 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा संघ 50 पेक्षा अधिक आघाडी मिळवेल, असे वाटत असताना उत्तुंग फटका मारण्याच्या नादात साउदी बाद झाला. साउदीने आपल्या खेळीत 2 षटकार आणि एक चौकार खेचला.

टीम साउदीने मारलेल्या षटकारामुळे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या एकाला दुखापत झाली. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील 100 व्या षटकात हा सर्व प्रकार घडला. 100 व्या षटकातील रविंद्र जडेजाच्या षटकात साउदीने उत्तुंग षटकार खेचला.डीप मिड-विकेटच्या दिशेने लगावलेला हा चेंडू थेट प्रेक्षकाच्या गालावर आदळला. चेंडू लागला असला तरी घाबरण्याची गोष्ट नाही. मी ठिक आहे, असा इशाराही या चाहत्याने केल्याचे पाहायला मिळाले.

फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिल्यानंतर साउदीने टीम इंडियाला सुरुवातीला धक्के दिले. भारताच्या दुसऱ्या डावात त्याने रोहित शर्मा आणि शुभमन गिलला स्वस्तात तंबूत धाडले. या दोन विकेटसह त्याने एक खास विक्रमही आपल्या नावे केलाय. आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात 600 विकेट्स घेणारा साउदी हा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरलाय. रोहित आणि शुभमन गिलशिवाय त्याने बुमराह आणि शमीची देखील विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com