सिंधूकडून आज सुवर्णाची अपेक्षा 

Today's expectations of gold from Sindhu
Today's expectations of gold from Sindhu

जकार्ता : महत्त्वाच्या दीर्घ रॅलीज जिंकत पी. व्ही. सिंधूने आशियाई क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, तर साईना नेहवाल तई झु यिंगचा झंझावात रोखणार, असे वाटत असतानाच पिछाडीवर जात होती. त्यामुळे सर्वच भारतीयांचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे अंतिम फेरी पाहण्याचे स्वप्न भंगले. अर्थात, सिंधू भारताचे आशियाई क्रीडा बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक नक्कीच जिंकू शकते. 

बेसलाइनवरून दीर्घ रॅलीज खेळणे आणि त्याच वेळी प्रतिस्पर्धीस जास्तीत जास्त वेळ बेसलाइनवर ठेवणे अवघड असते, पण साईनाने हे आव्हान चांगले पेलले आहे, असे वाटत असतानाच ती मागे जात होती. अगदी दुसऱ्या गेमच्या मध्यापर्यंत तई साईनाला तीन गुणांनी मागे टाकत आहे आणि साईना तिला काही वेळांतच गाठत आहे, असे दिसत होते. नेमके याच वेळी तईच्या फसव्या रॅलीज प्रभावी ठरत होत्या. तईला बॅकहॅंडच्या जाळ्यात पकडण्याची साईनाची योजना पहिल्या गेमच्या सुरवातीस काही शॉट्‌स चुकल्याने प्रभावी ठरली नाही. 
साईनाने 32 मिनिटांच्या या लढतीत चांगला प्रतिकार केला, पण अखेर ती 17-21, 14-21 अशी पराजित झाली. तईची आपल्याविरुद्धची विजयी मालिका रोखण्यात साईनास मोक्‍याच्या क्षणी गुण गमावल्याने अपयश आले. 

सिंधूने पुन्हा एकदा अकेन यामागुची हिला नमवले. या स्पर्धेत सांघिकमध्ये सिंधूच दोघींतील लढतीत जिंकली होती. सिंधूने आपल्या जास्त उंचीचा चांगला फायदा घेत लढत 21-17, 15-21, 21-10 अशी जिंकली. तिची रिच चांगली होती. मोक्‍याच्या वेळी गुण जिंकतानाच त्या वेळी खेळ उंचावत होती. यामागुचीची जिद्द वाखाणण्याजोगी होती. तिने दुसऱ्या गेममध्ये सिंधूवर दडपणही आणले. त्यामुळे सिंधूला पुन्हा तीन गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले. सिंधूला जणू दीर्घ लढतींचा सरावच होत आहे. या वेळीही तिची आक्रमकता यामागुचीला चुका करण्यास भाग पाडत होती. निर्णायक गेमच्या सुरुवातीस नेटला लागून आलेले शटल परतवण्याच्या प्रयत्नात सिंधू खाली पडली, त्या वेळी अनेकांचे फ्लॅश पडले, पण तो फोटो कॅमेरातच बंदिस्त राहील, याची खबरदारी जणू सिंधूने घेतली. त्यानंतर सबकुछ सिंधू हेच दिसले. 

आजच्या अंतिम फेरीबाबत 
- दोघींतील बारा लढतींत तईचे 9 विजय 
- गेल्या पाच सामन्यांत सिंधूचा पराभव 
- यापूर्वीचा विजय 2016 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत 
- महत्त्वाच्या स्पर्धेत तईची कामगिरी खालावते. 
- साईनाच्या तुलनेत सिंधूकडे जास्त उंचीचा फायदा. 
- स्पर्धेत दीर्घ लढती खेळण्याचा अनुभव. 
- तईच्या फसव्या रॅलीज सिंधूचा कस पाहू शकतील. 
- लढत दुपारी 12 वाजता अपेक्षित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com