Olympics Medal Tally: चीन टॉपर; जाणून घ्या भारतासह कोणाच्या खात्यात किती पदक

स्विमिंगमध्ये अमेरिकेच्या खेळाडूंनी तब्बल 11 सुवर्ण पदकांची कमाई केलीये.
Tokyo Olympics Medal
Tokyo Olympics Medalesakal

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics) चीनने आपला दबदबा कायम ठेवलाय. 24 सुवर्ण पदकासह (Tokyo Olympics Medal Tally) चीन अव्वल स्थानावर आहे. चीनने डायविंग इवेंटमध्ये सर्वाधिक 4 गोल्डची कमाई केलीये. नेमबाजीमध्येही चीनचा जबरदस्त निशाणा पाहायला मिळाला. नेमबाजीतील वेगवेगळ्या प्रकारात चीनने 9 पदक कमावली. यात 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकाचा समावेश आहे. वेट लिफ्टिंगमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंनी एकूण 5 सुवर्ण पदकांची कमाई केलीये. पदतालिकेत अमेरिका 20 सुवर्ण पदकासह दुसऱ्या स्थानावर आहे. स्विमिंगमध्ये अमेरिकेच्या खेळाडूंनी तब्बल 11 सुवर्ण पदकांची कमाई केलीये. यजमान जपानच्या खात्यात 17 सुवर्ण पदक पडली आहेत.

Tokyo Olympics Medal
प्रॅक्टिसवेळी टीम इंडियाचा ओपनर जखमी, पहिल्या मॅचला मुकणार

रविवारी बॅडमिंटन एकेरीत पीव्ही सिंधूनं (PV Sindhu Bronze Medal) कांस्य पदकासह भारताच्या खात्यात दुसरे पदक जमा केले. चीनच्या बिंगजिओ (He Bing Jiao) ला पराभूत करत सिंधूने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. स्पर्धेच्या 10 व्या दिवशी भारताच्या पदरात 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह केवळ 2 पदक जमा झाली आहेत. महिला बॉक्सिंगमध्येही भारताचे एक पदक निश्चित झाले असून सध्याच्या घडीला भारत पदतालिकेत 59 व्या स्थानावर आहे.

चीन (सुवर्ण- 29, रौप्य-17, कांस्य-16)

अमेरिका (सुवर्ण- 22, रौप्य-25, कांस्य-17)

जपान (सुवर्ण- 17, रौप्य-6, कांस्य-10)

ऑस्ट्रेलिया (सुवर्ण- 14, रौप्य-4, कांस्य-15)

भारत (सुवर्ण- 0, रौप्य-1, कांस्य-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com