esakal | Olympics Day 7 : विजयाच्या मालिकेत बसला पराभवाचा दणका!
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo Olympics

Olympics Day 7 : विजयाच्या मालिकेत बसला पराभवाचा दणका!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 Day 7 : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दिमाखदार विजय आणि बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पीव्ही सिंधूची आगेकूच याने दिवसाची विजयी सुरुवात झाली. तिरंदाजीमध्ये अतनू दासने तर बॉक्सिंगमध्ये सतिश कुमारने पदकाची आशा पल्लवित केल्या. अतनू दासने ऑलिम्पिकमधील माजी चॅम्पियनला शह देत अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित केलाय. दुसऱ्या बाजूला बॉक्सिंगमध्ये सतिश कुमारने 91 + किलो वजनी गटात त्याने क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.

नेमबाजीमध्ये 25 मीटर पिस्टल प्रकारात मनू भाकेर आणि राही सरनोबत शुटींग रेंजमध्ये दिसल्या. या दोघींनी अनुक्रमे 5 व्या आणि 25 व्या स्थानावर राहिल्या. दुसऱ्या फेरीत त्या कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. स्विमिंगमध्ये साजन प्रकाशला 46 स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले. हॉकी, बॅडमिंटन, तिरंदाजीसह पुरुष बॉक्सिंगमध्ये विजयी मालिका सुरु असताना अखेरच्या टप्प्यात भारताला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असलेली मेरी कोमला पराभवाचा सामना करावा लागला. यासह तिसा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.

स्विमिंग : पुरुष 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात साजन प्रकास सेमीफायनलमध्ये पात्र ठरण्यात अपयशी ठरला. त्याने 53.45 सेकंदात अंतर पूर्ण करणाऱ्या साजनला 46 स्थानावर समाधान मानावे लागले.

बॉक्सिंग : सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या मेरी कॉमचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. तिला क्वार्टर फायनलनध्ये कोलंबियाच्या इंग्रिट वालेन्सियाकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या राउंडमध्ये वालेन्सियाने बाजी मारली. तर दुसऱ्या राउंडला मेरी कोमने कमबॅक केलं. मात्र तिसऱ्या राउंडमध्ये वालेन्सियाने आक्रमकपणा दाखवत विजय मिळवला.

गोल्फ : अनिर्बन लाहिरेने पहिल्या दिवसाच्या खेळाची सुरुवात अप्रतिम अशी केलीये

सेलिंग : महिला लेजर रेडियल रेस 7 आणि 8 ला सुरुवात, भारताचे प्रतिनिधीत्व करतेय नेत्रा कुमारन

तिरंदाजी : अतनू दासचा लक्षवेधी विजय; दक्षिण कोरियाच्या माजी ऑलिम्पिक चॅम्पियनला दिली मात

बॅडमिंटन : पीव्ही सिंधूची क्वार्टर फायनलमध्ये धडक, डेन्मार्कच्या मिया विरुद्ध 21-15, 21-13 असा विजय

हॉकी : भारतीय पुरुष संघानं गतचॅम्पियन अर्जेंटिनाचा उडवला 3-1 असा धुव्वा

नेमबाजी : 25 मीटर पिस्टल प्रकारात मनू भाकर पाचव्या तर राही सरनोबत 25 व्या स्थानावर राहिल्या

loading image
go to top