एकेरीतील ऐतिहासिक प्रवास एकटीचा नाही; सिंधूनं खास शब्दांत मानले आभार

सिंधूने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
PV Sindhu
PV SindhuGO

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या रौप्य पदक विजेत्या सिंधूला ऑलिम्पिकच्या यंदाच्या स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सेमीफायनलमधील पराभवानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कांस्य पदकाच्या लढतीत तिने चीनच्या बिंगजिओला सरळ सेटमध्ये पराभूत करत देशाला टोकियो ऑलिम्पिकमधील दुसरे पदक मिळवून दिले. ऑलिम्पिकच्या इतिहासात सलग दोन वेळा पदक मिळवणारी भारताची ती पहिली महिला खेळाडूही ठरलीये. एकंदरीत विचार करता सुशील कुमारनंतर सलग दोनवेळा पदक मिळवणारी ती दुसरी भारतीय खेळाडू आहे.

ऐतिहासिक कामगिरीनंतर पीव्ही सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सिंधूने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. देशासाठी मिळवलेले मेडल माझ्यासाठी सर्व काही आहे. पाच वर्षांच्या परिश्रमानंतर मिळालेल्या यशानंतर मनातील भावना शब्दांत व्यक्त करु शकत नाही.

PV Sindhu
सिंधूला अलिशान कार द्या; आनंद महिंद्रा यांनी दिला खास रिप्लाय

एकेरीतील ऐतिहासिक प्रवास एकटीचा नाही. माझ्या यशस्वी प्रवासात पाठिशी असलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानते, अशा शब्दांत तिने प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. हा प्रवास इथेच थांबणार नाही, असे म्हणत देशासाठी आणखी काही मेडल मिळवण्यासाठी सज्ज असेन, असे संकेतही तिने आपल्या या खास पोस्टमधून दिले आहेत.

PV Sindhu
Olympics Medal Tally: चीन टॉपर; जाणून घ्या भारतासह कोणाच्या खात्यात किती पदक

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन स्टार रौप्य पदकाचे सुवर्ण पदकात रुपांतर करेल, अशी आशा होती. सुरुवातीपासून विजयी धडाका सुरुच ठेवत तिने आपले इरादे मजबूत असल्याचे दाखवूनही दिले. पण सेमीफायनलमध्ये चायनीज ताइपेची वर्ल्ड नंबर वन ताइ त्झू यिंगने 21-18, 21-12 असे सरळ सेटमध्ये तिला पराभूत केले. या पराभवासह सुवर्ण पदकाची आस संपली. त्यानंतर लगेचच तिचा सामना चीनच्या बिंग जिआओ (Bing Jiao) हिच्या झाला. कांस्य पदकाच्या लढतीत चीनच्या खेळाडूचा विक पाइंट शोधून सिंधूने एकाच ठिकाणी सातत्याने पाइंट घेत आपल्यातील कुशलता सिद्ध करत सामना सरळ सेटमध्ये जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com