...तर ऑलिंपिक रद्द करण्याचा पर्याय

सत्ताधारी पक्षाच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली भीती
...तर ऑलिंपिक रद्द करण्याचा पर्याय

टोकियो : कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होत राहिली तर यंदाची ऑलिंपिक रद्द करणे हाच पर्याय असेल असे मत जपानमध्ये सत्तेवर असलेल्या एलडीपी पक्षाचे सरचिटणीस तोशिहिरो निकाई यांनी व्यक्त केले. ऑलिंपिकला आता शंभरहून कमी दिवस राहिले असून पुन्हा एकदा अनिश्चिततेचे सावट तयार झाले आहे.

निकाई हे सत्तेत असलेल्या पक्षाचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहे. कोरोनाचा होत असलेला संसर्ग थांबला नाही तर ऑलिंपिक रद्द करणे हा एक पर्याय असू शकतो, अशी शक्यता त्यांनी एका टिव्ही शोमध्ये बोलताना व्यक्त केली. ऑलिंपिकला कालपासून १०० दिवस राहिले आहेत त्याचे काऊंटडाऊनही सुरू झाले आहे या पार्श्वभूमीवर निकाई यांनी केलेले वक्तव्य चिंता निर्माण करणारे आहे.

चौथ्या लाटेस प्रारंभ?

जपानमध्ये कोरोना परतला आहे आणि चौथी लाट सुरू उंबरठ्यावर आहे, अशी शक्यता सरकारच्या कोव्हिड पॅनेलच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. जपान सरकारच्या कोविड साथ प्रतिबंध उपसमितीचे प्रमुख शिगेर ओमी यांनी अतिशय काटेकोर अंमलबजावणी आणि उपाय करण्यासाठी नियमात बदल करण्याची सूचना सरकारला केली आहे.

ऑलिंपिक होत असलेल्या टोकियो, क्योटो आणि ओकिनावा या शहरांत कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.या शहरांमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com