esakal | पंतप्रधान मोदींनी सिंधूसोबत आखला आईस्क्रिमचा बेत!
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi and PV Sindhu

पंतप्रधान मोदींनी सिंधूसोबत आखला आईस्क्रिमचा बेत!

sakal_logo
By
सुशांत जाधव

ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रोत्साहित केले. ऑनलाईनच्या माध्यमातून मोदींनी खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांशी एकत्रित सवांद साधला. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून देणारी महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूशी गप्पा गोष्टी करताना मोदींनी सरावाच्या पूर्वतयारीच्या मुद्यावरुन बोलण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या काळात अनेक निर्बंध होते. प्रोटोकॉलचे पालन करत योग्य सराव झाल्याचे सिंधूने यावेळी सांगितले. (Tokyo Olympics PM Narendra Modi promises to have ice cream with PV Sindhu after Summer Games)

यावेळी मोदींनी रिओ ऑलिम्पिकवेळीच्या काही गोष्टींना उजाळा दिला. यावेळी प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सिंधूचा फोन काढून घेतला होता. एवढेच नाही तर आईस्क्रीम खाण्यावरही तिच्यावर बंधन आणले होते. या गोष्टीला उजाळा देताना अजूनही आईक्रीम खाण्यावर मनाई आहे का? असा प्रश्न मोदींनी सिंधूला विचारला. यावर एका खेळाडूला डाएटवर नियंत्रण ठेवावे लागते, त्यामुळे अधिक आईस्क्रीम खात नाही, असे सिंधू म्हणाली.

हेही वाचा: साताऱ्याच्या ऑलिम्पियनचे आई-वडील खरे चॅम्पियन; PM मोदींची दाद

पीव्ही सिंधूला खेळाचा वारसा लाभला आहे. तिचे वडील पीव्ही रमणा आणि आई पीव्ही विजया दोघेही खेळाडू होते. त्यांच्याशीही मोदींनी संवाद साधला. देशातील अनेक पालकांना आपल्या मुलाला खेळाडू बनवाने असे वाटते. अशा देशवासियांना तुम्ही काय संदेश द्याल, असा प्रश्न त्यांनी सिंधूच्या आई-वडिलांना विचारला होता. यावेळी सिंधूच्या वडिलांनी मुलांना प्रोत्साहन देणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे सांगितले.

हेही वाचा: WI vs AUS: गेल नव्हे या कॅरेबियनच्या जाळ्यात फसले कांगारु

गत ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणे यंदाच्या वर्षीही पीव्ही सिंधू देशासाठी पदकाची कमाई करेल, असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. जपानमधून यशस्वी होऊन मायदेशी परतल्यानंतर सोबत आईस्क्रिमचा बेत आखू असेही मोदी सरशेवटी सिंदूला म्हणाले.

loading image