esakal | INDvsNZ : न्यूझीलंड संघ खेळणार कसा? दुखापतीने 'हे' चार महत्वाचे खेळाडू संघाबाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

Tom Latham out of India T20Is with finger fracture
  • अरेsss खेळणार कसं? चौथा खेळाडू संघाबाहेर गेलाय...

INDvsNZ : न्यूझीलंड संघ खेळणार कसा? दुखापतीने 'हे' चार महत्वाचे खेळाडू संघाबाहेर

sakal_logo
By
वृत्तसेवा

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 जानेवारीपासून टी20 मालिकेला सुरवात होणार आहे. मात्र, न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथमला दुखापतीमुळे टी20 मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याची उजव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली. त्यामुळे त्याला भारताविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेला मुकावे लागणार आहे. 

आणखी बातम्या वाचा : धक्कादायक : अॅक्सिस बॅंकेत 15,000 कर्मचाऱ्यांचे राजीनामे

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत टी20 मालिका होणार आहे. त्यानंतर पाच फेब्रुवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत पुनरागमन करण्याचे लॅथमचे उद्दिष्ट असेल. न्यूझीलंडला आधीच दुखापतींचे ग्रहण लागले असताना आता लॅथमचीही त्याला भर पडली आहे. 

न्यूझीलंडचे दुखापतग्रस्त खेळाडू

  • टॉम लॅथम
  • लोकी फर्ग्युसन
  • ट्रेंट बोल्ट
  • मॅट हेन्री
loading image