तुर्कीचा पराभव पण चाहता 'जिंकला', गर्लफ्रेंडला केलं होतं प्रपोज; VIDEO VIRAL

तुर्कीचा पराभव पण चाहता 'जिंकला', गर्लफ्रेंडला केलं होतं प्रपोज; VIDEO VIRAL

रोम - गेल्यावर्षी भारत ऑस्ट्रेलिया मालिकेवेळी एका भारतीय तरुणाने मैदानावरच प्रपोज केल्याचा प्रकार घडला होता. यानतंर आता युरो चॅम्पियनशिप स्पर्धेच्या 16 व्या हंगामात इटली आणि तुर्की यांच्यातील सामन्यावेळी एका फुटबॉल चाहत्यानं गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. तुर्कीला या सामन्यात पराभव पत्करावा लागला, मात्र तुर्कीच्या चाहत्यानं त्याच्या गर्लफ्रेंडचं मन जिंकलं. सामन्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती मैदानाबाहेर चाहत्यानं गर्लफ्रेंडला केलेल्या प्रपोजची.

तुर्कीच्या या चाहत्याने हाय व्होल्टेज सामन्यावेळी गर्लफ्रेंडला स्टँडमध्ये प्रपोज केलं. दोघेही इटली आणि तुर्कीचा सामना सुरु असताना एंगेजही झाले. चाहता प्रपोज करत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो एका गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला प्रपोज करतो. तिने हो म्हणताच त्यानं रिंगसुद्धा दिली.

तुर्कीचा पराभव पण चाहता 'जिंकला', गर्लफ्रेंडला केलं होतं प्रपोज; VIDEO VIRAL
COPA : मेस्सीच्या गोलला चिलीकडून मिळालं प्रतिउत्तर (VIDEO)

प्रपोज केल्यानंतर जेव्हा तिने होकार दिला तेव्हा आजुबाजुला असलेल्यांनीसुद्धा जल्लोष केला. त्याचं प्रपोज स्वीकारल्यानंतर तिने अलिंगनही दिलं. या दोघांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाइक आणि शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com