World Cup 2019 : तेव्हा कुंबळेंना हाकललं आता शास्त्रींना हाकला

World Cup 2019 : तेव्हा कुंबळेंना हाकललं आता शास्त्रींना हाकला

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमावरुन बरीच चर्चा झाली आणि यातच प्रशिक्षक रवी शास्त्रींना टार्गेट करण्यात येत आहे. 

भारताचा पराभवानंतर आता शास्त्रींनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. 2017मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवानंतर त्यावेळचे प्रशिक्षक अनिल कुंबळेंची प्रशिक्षकपदीवरुन हाकलपट्टी करण्यात आली होता. आता शास्त्रींनाही असेच हाकलून द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com