काय मग IPL कधी सोडणार? चाहत्याने रोहितला विचारला भन्नाट प्रश्न 

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

''मी अपेक्षा करतो, ही दिवाळी तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येईल. दिव्यांसोबत फटाके फोडताना यांची काळजी घ्या. त्यांना असं घाबरलेलं पाहणं खूप भयानक आहे.''

मुंबई : दिवाळी म्हणजे फटाके आलेच मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाचे प्रमाण वाढल्याने सर्वांनीच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुक्या जनावरांना फटक्यांचा सर्वाधिक त्रास होतो. भारताचा सलामीवीर रोहित शर्मानेही पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा, फटको उडवू नका असा सल्ला देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे.

भारतातील अनेक खेळाडूंनी यावेळी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ''मी अपेक्षा करतो, ही दिवाळी तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येईल. दिव्यांसोबत फटाके फोडताना यांची काळजी घ्या. त्यांना असं घाबरलेलं पाहणं खूप भयानक आहे,'' असे म्हणत त्याने कुत्र्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

मात्र, चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. काही चाहत्यांनी आयपीएलमध्ये वाजणाऱ्या फटाक्यांचा व्हिडीओ त्याच्या कमेंट बॉक्समध्ये टाकत आयपीएल कधी सोडतोयस? असा सवाल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as Rohit Sharma posts a video of dogs on Diwali