INDvsBAN : दिल्लीतील प्रदूषणामुळे 'या' दोन खेळाडूंना झाला उलट्यांचा त्रास

वृत्तसंस्था
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

हा त्यांचा भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी20 विजय होता. मात्र, या विजयाचे आनंद फार काळ टीकला नाही कारण दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेशच्या संघातील दोन खेळाडूंना उलट्यांचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. 

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात बांगलादेशने भारतावर विजय मिळवला. हा त्यांचा भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी20 विजय होता. मात्र, या विजयाचे आनंद फार काळ टीकला नाही कारण दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेशच्या संघातील दोन खेळाडूंना उलट्यांचा त्रास झाल्याचे समोर आले आहे. 

दिल्लीतील प्रदूषणाने उच्च पातळी गाठल्याने या ठिकाणी सामना घेतला जाऊ नये अशा वारंवार मागणी करण्यात आली होती. तरीही सामना दिल्लीतच घेण्यात आला. आता या प्रदूषणाचा बांगलादेशी खेळाडूंना त्रास झाल्याची माहिती आता समोर येते आहे.

Image result for liton das in delhi with mask

बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार आणि अजून खेळाडूला पहिल्या सामन्यादरम्यान उलट्यांचा त्रास झाल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाने समोर आणली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

प्रशिक्षक म्हणाले होते लगेच मरणार नाहीत
ट्वेंटी20 हा केवळ तीन तासांचाच खेळ आहे त्यामुळे फार चिंता करण्याचे कारण नाही. डोळ्यांना थोडा त्रास होऊ शकतो. घसा खवखवू शकतो, परंतु कोणाच्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती नाही
- रसेल डॉमिन्गो  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Bangladeshi players fell sick due to air pollution in Delhi during T20 between INDvsBAN