भारताच्या अपंग जगज्जेतेपदात दोन काश्‍मिरी युवकांची चमक

जम्मू काश्मीरमधील युवकांची चमक
जम्मू काश्मीरमधील युवकांची चमक

मुंबई : भारताच्या अपंग संघाने यजमान इंग्लंडला पराजित करून ट्‌वेंटी-20 जागतिक सीरिजचे विजेतेपद जिंकले. या संघातील प्रत्येक सदस्य आपल्या यशाचा आनंद आप्तेष्टांना सांगत होता; पण याच संघातील दोन काश्‍मिरी युवकांना स्पर्धा जिंकल्यानंतर सोडाच; पण स्पर्धेसाठी आल्यापासूनच घरच्यांबरोबर संपर्क साधता आलेला नाही.

घटनेतून 370 कलम दूर केल्यापासून जम्मू-काश्‍मीरमधील संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली आहे. संपर्क यंत्रणाच बंद आहे. त्यामुळे घरी कोणाशीच बोलता येत नाही. आम्हालाही विजेतेपद जिंकल्याचे घरच्यांना सांगायचे आहे; पण हे कसे जमणार? त्यांची काळजीही वाटत आहे, असे भारतीय संघातील वासिम इक्‍बाल खान आणि आमीर हसन राथर यांनी सांगितले.

वासिम हा दक्षिण काश्‍मीरमधील गोपालपुरा येथील आहे; तर आमीर बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील तारझू येथील आहे. ईदच्या दिवशीही आम्ही कुटुंबीयांशी, मित्राशी बोलू शकलो नाही. मात्र संघातील सहकाऱ्यांनी घरच्यांची उणीव फारशी जाणवू दिली नाही. आम्ही त्यांच्यासोबत ईदचा तसेच विजेतेपदाचा आनंद साजरा केला, असे वासीमने सांगितले.

वासीम हा इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर आहे. या सलामीच्या फलंदाजाने पाकिस्तानविरुद्ध 33 चेंडूत 69 धावा केल्या. आमीर हा संघातील सर्वात लहान खेळाडू आहे. त्याने स्पर्धेत पाच फलंदाज बाद केले. आमीर हा चांगला डावखुरा गोलंदाज आहे. तो मुंबईच्या 23 वर्षांखालील संघाकडूनही खेळू शकेल, असे संघाचे मार्गदर्शक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com